मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आयपीएल आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंन्टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने मुंबई इंडियन्स संघाने सचिन परिधान करत असलेली १० नंबरची जर्सीही निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
सचिनच्या मातृप्रेमाला बीसीसीआयचा सलाम
सचिनची १० नंबरची जर्सी यापुढे संघात कोणीही परिधान करणार नसल्याचे मुंबई इंडियन्स संघाने स्पष्ट केले आहे. यामोसमात मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल आणि चॅम्पियन्स लीग या दोन्ही स्पर्धांच्या जेतेपदाला गवसणी घातली. सचिनने याआधीच ट्वेन्टी-२० मधून निवृत्ती घेतल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता आपल्या २००व्या कसोटीनंतर कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती घेणार असल्याचे पत्र सचिनने बीसीसीआयला पाठविले आहे.
आईसाठी सचिन मुंबईत खेळणार अखेरची कसोटी..
मुंबई इंडियन्सच्या संघमालक नीता अंबानी यांनी सांगितले की, मास्टर ब्लास्टरच्या सन्मानार्थ आम्ही हा निर्णय घेतला आहे. सचिनसोबत १० नंबरची जर्सी संघातून निवृत्त करणे हा आमच्यासाठी भावनिक क्षण आहे. सचिनच्या कामगिरीची तुलना कोणीही करू शकत नाही. त्यामुळे त्याच्या क्रमांकाची जर्सीही कोणी परिधान करू शकत नाही. असेही नीता अंबानी म्हणाल्या.