04 June 2020

News Flash

सायना, सिंधूची घोडदौड

जेतेपदाचे दावेदार असणाऱ्या सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधूसह पारुपल्ली कश्यप, किदम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय यांनी सय्यद मोदी ग्रां. प्रि. बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत स्थान

| January 24, 2015 03:22 am

जेतेपदाचे दावेदार असणाऱ्या सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधूसह पारुपल्ली कश्यप, किदम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय यांनी सय्यद मोदी ग्रां. प्रि. बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत स्थान पटकावले.
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालने अरुंधती पनतावणेला २१-१८, २१-१७ असे नमवले. उपांत्य फेरीत सायनाचा मुकाबला थायलंडच्या चौथ्या मानांकित निचाऑन जिंदापॉनशी होणार आहे.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची दोन जेतेपदे नावावर असणाऱ्या पी. व्ही. सिंधूने सहाव्या मानांकित पॉर्नटिप ब्युरानप्रार्स्टुकवर ८-२१, २१-११, २१-१४ असा विजय मिळवला.
तृतीय मानांकित पारुपल्ली कश्यपने सिंगापूरच्या झि लिआंग डेरेक वांगचा २१-१८, २१-९ असा पराभव केला. प्रतिस्पर्धी खेळाडूने दुखापतीमुळे माघार घेतल्याने अव्वल मानांकित श्रीकांतला विजयी घोषित करण्यात आले. चौथ्या मानांकित एच. एस. प्रणॉयने आरएमव्ही गुरुसाईदत्तला २१-१८, २१-१९ असे नमवले.
दुहेरीत मनू अत्री-के. मनीषा जोडीने मलेशियाच्या एक क्वान तान आणि मेंग यिन लीचा २३-२१, १०-२१, २१-१० असा पराभव केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2015 3:22 am

Web Title: saina sindhu enter 2nd round in lucknow
Next Stories
1 सन्मानापेक्षा पदक महत्त्वाचे -नारंग
2 महात्मा गांधी संघ, सागर क्रीडा मंडळाला जेतेपद
3 श्रीनिवासन पेचात
Just Now!
X