टीम इंडियाच्या 2020 मधील पहिल्या परदेश दौऱ्यासाठी BCCI ने संघ जाहीर केला. जानेवारी महिन्याच्या अखेरीस भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ५ टी-२०, ३ वन-डे आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची रविवारी रात्री उशीरा घोषणा करण्यात आली. या संघात अपेक्षेप्रमाणे रोहित शर्माने भारतीय संघात पुनरागमन केले पण युवा यष्टीरक्षक संजू सॅमसनला मात्र संघात स्थान मिळाले नाही. तसेच दुखापतीमुळे हार्दिक पांड्यादेखील न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेला मुकणार आहे.

Video : भावा….. नादखुळा! चहलच्या थ्रोवर विराट फिदा

संजू सॅमसनला संधी नाही…

श्रीलंकेविरूद्धच्या टी २० मालिकेत भारताने विजय मिळवला. त्यापैकी एकाच सामन्यात संजू सॅमसनला संधी देण्यात आली होती. त्या सामन्यात त्याने पहिला चेंडू षटकार लगावला तर दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. त्यानंतर न्यूझीलंड मालिकेसाठी भारताच्या संघात संजू सॅमसनला संधी दिली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण त्याला संघातून वगळल्यामुळे नेटकऱ्यांनी BCCI वर टीकेची झोड उठवली आहे.

“मला जमलं नाही…”; पराभवानंतर मलिंगा झाला भावनिक

नेटकऱ्यांनी BCCI ला झोडपले

असा आहे न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रविंद्र जाडेजा आणि शार्दुल ठाकूर