भारतीय संघाने विराट कोहीलच्या नेतृत्वाखाली २०२० या वर्षाची सुरुवात मालिका विजयाने केली. श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने ७८ धावांनी बाजी मारली. या विजयासह भारताने ३ टी-२० सामन्यांची मालिका २-० ने जिंकली. नवीन वर्षातला भारतीय संघाचा हा पहिला मालिका विजय ठरला.

“पंतच्या जागी सॅमसनला संधी का?” धवनने दिलं सूचक उत्तर

सामन्यात श्रीलंकेची धावसंख्या ६ बाद ११० होती. हसरंगा आणि धनंजया हे दोघे फलंदाज खेळत होते. त्यावेळी शार्दूल ठाकूरने हसरंगाला गोलंदाजी केली. चेंडू चहलकडे गेल्यामुळे फलंदाजांनी धाव घेण्याचा प्रयत्न केला, पण चहलचा थ्रो थेट स्टंपवर लागला आणि हसरंगा बाद झाला. आपण मारलेला थ्रो स्टंपवर लागला हे पाहून चहल तर हसू लागलाच, पण विराटदेखील तुफान खुश झाला आणि चहलचं अभिनंदन करायला धावला.

“मला जमलं नाही…”; पराभवानंतर मलिंगा झाला भावनिक

पाहा व्हिडीओ –

LBW नाही तर Run Out… विकेट तर घेणारच!; पाहा बुमराहचा भन्नाट Video

टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात मारली बाजी

भारताने प्रथम फलंदाजी करत २०१ धावा केल्या आणि श्रीलंकेला २०२ धावांचे आव्हान दिले. दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. पहिले ४ फलंदाज अवघ्या २६ धावांत माघारी परतले. यानंतर अँजलो मॅथ्यूज आणि डी-सिल्वा यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ही जोडी माघारी परतल्यानंतर लंकेचा डाव पुन्हा एकदा कोलमडला. भारताकडून नवदीप सैनीने ३, शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी २-२ तर जसप्रीत बुमराहने १ बळी घेतला.

Video : सुपर यॉर्कर! सैनीने उडवला फलंदाजाचा भन्नाट त्रिफळा

त्याआधी, सलामीवीर लोकेश राहुल आणि शिखर धवन यांची अर्धशतके तर मधल्या फळीत विराट कोहली, शार्दुल ठाकूर आणि मनिष पांडे यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने २०१ धावांपर्यंत मजल मारली. श्रीलंकेकडून संदकनने ३ तर लहिरु कुमारा आणि डी-सिल्वाने १-१ बळी घेतला.