रशियाची मारिया शारापोव्हा आणि अमेरिकेची सेरेना विल्यम्स या दिग्गज टेनिसपटूंमध्ये सोनी खुल्या टेनिस स्पर्धेचा अंतिम मुकाबला रंगणार आहे. चार वेळा उपविजेतेपदावर समाधान मानणाऱ्या शारापोव्हाने जेलेना जान्कोविच हिचा ६-२, ६-१ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर सेरेनाने गतविजेत्या अग्निस्झेका रॅडव्हान्स्का हिचा ६-०, ६-३ असा धुव्वा उडवून अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. शारापोव्हाला चार वेळा किम क्लायस्टर्स (२००५), स्वेतलाना कुझनेत्सोव्हा (२००६), व्हिक्टोरिया अझारेन्का (२०११) आणि रॅडव्हान्स्का (२०१२) या प्रतिस्पध्र्याकडून अंतिम फेरीत हार पत्करावी लागली आहे. शारापोव्हाला सेरेनाविरुद्ध फक्त दोनच सामने जिंकता आल्यामुळे जेतेपदासाठी खडतर आव्हान तिच्यासमोर असणार आहे.