News Flash

टेनिस सम्राज्ञी सेरेना विल्यम्सला कन्यारत्न

गर्भवती असताना देखील सेरेना ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळली

टेनिस सम्राज्ञी सेरेना विल्यम्सला कन्यारत्न
सेरेनाच्या घरी छोट्या परीचं आगमन झाल्यानंतर जगभरातून टेनिसप्रेमी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.

टेनिस सम्राज्ञी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेरेना विल्यम्स हिने शुक्रवारी गोंडस मुलीला जन्म दिला. सेरेनाची मोठी बहिणी व्हिनस विल्यम्स हिने काही महिन्यांपूर्वी झालेल्या युएस ओपन स्पर्धेच्यावेळी आपण मावशी बनणार असल्याची आनंदवार्ता चाहत्यांना दिली होती. ‘मी लवकरच मावशी बनणार आहे आणि हा आनंद शब्दात व्यक्त न करता येण्यासारखा आहे’ अशी प्रतिक्रिया व्हिनसने सामना जिंकल्यानंतर दिली होती.

गर्भवती असताना देखील सेरेना जानेवारी महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळली होती. यावेळी ग्रँड स्लॅम जिंकून आणि गर्भवती असल्याची बातमी सांगून तिनं चाहत्यांचा आनंद द्विगुणीत केला होता. ऑस्ट्रेलियन ओपन सुरू होण्याच्या दोन दिवस आधीच आपण गर्भवती असल्याचं तिला समजलं होतं. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत तिनं यावेळचा एक किस्साही सांगितला.. ‘ऑस्ट्रेलियन ओपनसाठी मी सराव करत होती, स्पर्धा सुरू व्हायला दोन दिवस बाकी होते आणि अचानक तब्येत बिघडली, काही चाचण्या केल्यानंतर मी गर्भवती असल्याचं मला समजलं, खरं तर मला कोणत्याही परिस्थितीत विजेतेपद जिंकायचं होतं, मी यासाठी वर्षभरापासून खूपच मेहनत घेतली होती. तेव्हा गर्भवती असण्याचा आनंद आणि सामना जिंकण्याचं दडपण मनावर होतं’ असंही तिनं सांगितलं होतं. अशाही स्थितीत ती खेळली आणि ग्रँड स्लॅमवर आपलं नाव कोरलं. सेरेनाच्या घरी छोट्या परीचं आगमन झाल्यानंतर जगभरातून टेनिसप्रेमी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. राफेल नदालने देखील ट्विट करून सेरेनाला शुभेच्छा दिल्यात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2017 11:54 am

Web Title: serena williams gives birth to baby girl
टॅग : Serena Williams
Next Stories
1 वोझ्नियाकीचे आव्हान संपुष्टात
2 धोनी अजूनही संपलेला नाही -शास्त्री
3 भारताविरुद्धच्या मालिकेनंतर कारकीर्दीचा विचार करणार -मलिंगा
Just Now!
X