News Flash

आफ्रिदी ट्वेण्टी-२० संघाचा कर्णधार

पाकिस्तानचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदीची २०१६ च्या ट्वेण्टी-२० विश्वचषकापर्यंत कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली.

| September 17, 2014 12:01 pm

पाकिस्तानचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदीची २०१६ च्या ट्वेण्टी-२० विश्वचषकापर्यंत कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. तर मिसबाह-उल-हककडे कसोटी आणि एकदिवसीय संघाचे कर्णधारपद कायम ठेवण्यात आले आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या (पीसीबी) बैठकीमध्ये हे महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी घेण्यात आले. मोहम्मद हफिझकडे पाकिस्तानच्या ट्वेण्टी-२० संघाचे कर्णधारपद होते. पण सातत्याने पाकिस्तानला ट्वेण्टी-२० सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्याने आफ्रिदीवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2014 12:01 pm

Web Title: shahid afridi appointed pakistan skipper in t20 format
टॅग : Shahid Afridi
Next Stories
1 डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा : सर्बियाची सरशी
2 ऐतिहासिक सुवर्ण कामगिरीची गरज
3 गुणवान प्रशिक्षकांचीच वानवा – मल्लेश्वरी
Just Now!
X