श्रीलंकेविरुद्ध आगामी ५ वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी आज दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. या दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या निवड समितीने इम्रान ताहीरला विश्रांती दिली असून, तबरेज शम्सी आणि केशव महाराज यांना संघात जागा दिली आहे. आगामी २०१९ च्या विश्वचषकाआधी दक्षिण आफ्रिकेच्या निवड समितीने संघात काही नवीन बदल करण्याचं ठरवलं आहे.

श्रीलंका दौऱ्यासाठी असा असेल दक्षिण आफ्रिकेचा संघ –

फाफ डु प्लेसिस (कर्णधार), हाशिम आमला, ज्युनिअर डाला, क्विंटन डी-कॉक, जे. पी. ड्युमिनी, रेझा हेंड्रीक्स, हेन्रीच क्लासेन, केशव महाराज, एडन मार्क्रम, डेव्हिड मिलर, विआन मल्डर, लुन्गिसानी एन्गिडी, अँडील फेलुक्वायो, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी