चेक प्रजासत्ताकचा जिरी वेसली टाटा खुल्या महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा विजेता ठरला. पुरुष दुहेरीचे विजेतेपद इंडोनेशियाचा ख्रिस्तोफर रुंगकट आणि स्वीडनचा आंद्रे गोरान्सन या जोडीने पटकावले.

पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत वेसलीने बेलारुसच्या इगोर गेरासिमोवला ७-६, ५-७, ६-३ असे नमवले. पहिला सेट वेसलीने जिंकल्यावर दुसरा सेट गमावला होता. मात्र पुन्हा तिसरा सेट सहज जिंकत वेसलीने बाजी मारली. पुरुष दुहेरीत रुंगकट-गोरान्सन जोडीने अंतिम फेरीत इस्रायलचा जोनाथन एर्लिच आणि बेलारुसचा आंद्रेई वासिलेवस्की जोडीचा ६-२, ३-६, १०-८ असा पराभव केला.