महेंद्रसिंग धोनीच्या कप्तानीखाली भारतीय संघ न्यूझीलंडच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यासाठी रविवारी रवाना झाला. या दौऱ्यामध्ये भारतीय संघ दोन कसोटी आणि पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.
दौऱ्यातील पहिला एकदिवसीय सामना १९ जानेवारीला नेपिअरला तर अखेरचा सामना ३१ जानेवारीला वेलिंगटनला होणार आहे. पहिली कसोटी ६-१० फेब्रुवारी दरम्यान ऑकलंडला आणि दुसरी कसोटी १४-१८ फेब्रुवारीला वेलिंग्टन येथे होईल.
भारताचे दोन्ही संघ पुढीलप्रमाणे-
एकदिवसीय संघ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, सुरेश रैना, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी, इशांत शर्मा, अमित मिश्रा, ईश्वर पांडे, स्टुअर्ट बिन्नी आणि वरुण आरोन.
कसोटी संघ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी, इशांत शर्मा, ईश्वर पांडे, उमेश यादव, वृद्धिमान साहा आणि झहीर खान.