News Flash

ऑस्ट्रेलिायच्या कर्णधाराला आयसीसीनं ठोठावला दंड

पंचाला शिवीगाळ केल्याप्रकरणी केला दंड

सिडनी येथे तिसऱ्या कसोटी सामन्यात पंचाशी हुज्जत घातल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याला आयसीसीनं दंड ठोठावला आहे. तिसऱ्या दिवशी पंचाशी हुज्जत घातल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर पेनवर कारवाई करण्यात आली आहे. सामन्याच्या मानधनातून १५ टक्के रक्कम कपात करण्याचा दंड पेनला करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन याला अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) नियम २.८ नुसार आचार संहिता भंग केल्याप्रकरणी दोषी आढळला. त्यामुळे त्याला सामन्याच्या मानधनातून १५ टक्के रक्कम कपात करण्याचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयसीसीनं जारी केलेल्या वक्तव्यात म्हटलेय की, ‘टीम पेन यानं नियमाचा भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्याशिवाय त्याच्या अनुशासनात्मक रिकॉर्डमध्ये एक ‘डिमेरिट’ अंक जोडण्यात आला आहे. मागील २४ महिन्यात पेन याची ही पहिलीच चूक आहे.’

आणखी वाचा- गरज पडल्यास इंजेक्शन घेऊन जाडेजा उतरणार मैदानात

तिसऱ्या दिवसाच्या खेळात नॅथन लायन गोलंदाजी करत असताना पुजाराच्या पॅडला लागून चेंडू उडाला आणि तो झेल घेण्यात आला. पुजाराला पंचांनी नाबाद ठरवल्यानंतर लगेचच ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन याने DRSची मदत घेतली. रिव्ह्यूमध्ये चेंडू बॅटला लागला की नाही याबद्दल नीट कळू शकलं नाही. चेंडू बॅटच्या आतल्या बाजूला लागल्याची शक्यता असल्याने ऑफ साईडच्या कॅमेरात काहीही कळलं नाही. घडलेला प्रकार पाहून ऑस्ट्रेलियन कर्णधार पेन प्रचंड भडकला. मैदानावरील पंच विल्सन यांच्याशी पेन वाद घालू लागला. त्यावेळी पंचांनी त्याला सांगितलं की तिसऱ्या पंचांचा निर्णयच अंतिम असेल. त्यावर उत्तर देताना पेनने पंचांना शिवीगाळ केली. “F**king consistency, Blocker, there’s a thing (spike) that goes past it”, असं वाक्य उच्चारत त्याने आपली नाराजी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2021 8:13 am

Web Title: tim paine fined 15 percentage match fee for showing dissent to umpire nck 90
Next Stories
1 संकटमोचक पंत; दुखापतीनंतरही कांगारुंची केली धुलाई
2 ऋषभ पंतची फटकेबाजी; अद्यापही विजय दृष्टीपथात!
3 जडेजा इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांना मुकणार
Just Now!
X