News Flash

कहीं खुशी, कहीं गम!

प्रथमच यजमानपदाचा मान मिळालेल्या भारतासाठी थॉमस-उबेर चषक स्पर्धेचा पहिला दिवस संमिश्र ठरला.

| May 19, 2014 07:23 am

प्रथमच यजमानपदाचा मान मिळालेल्या भारतासाठी थॉमस-उबेर चषक स्पर्धेचा पहिला दिवस संमिश्र ठरला. उबेर चषकात भारतीय महिला संघाने कॅनडावर ५-० असा दणदणीत विजय मिळवला, मात्र पुरुषांमध्ये बलाढय़ मलेशियाने भारताचा ४-१ असा धुव्वा उडवला.
‘फुलराणी’ सायना नेहवालने जॉयसेल्यान को हिच्यावर सरळ गेममध्ये २१-४, २१-१२ असा विजय मिळवत भारताला शानदार सलामी करून दिली. युवा पी.व्ही.सिंधूने राचेल होनडेरिचवर २१-१६, २१-३ अशी मात करत भारताला २-० आघाडी मिळवून दिली. दुहेरीत अनुभवी ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीने ब्रूस अलेक्स-फ्यालिस चान जोडीचा २१-११, २१-१२ असा पराभव करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तिसऱ्या एकेरीच्या लढतीत पी.सी.तुलसीने ब्रिटनी तामचा २१-११, २१-१३ असा पराभव केला. शेवटच्या दुहेरी लढतीत प्रज्ञा गद्रे आणि सिक्की रेड्डीने ग्रेस गाओ-राचेल होनडेरिच जोडीवर २०-२२, २१-१८, २१-१६ असा विजय मिळवत भारताला निर्विवाद विजय मिळवून दिला.
पुरुषांमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ली च्योंग वेईने किदम्बी श्रीकांतवर २१-१९, २१-१२ असा विजय मिळवला. दुहेरीच्या पहिल्या लढतीत बून हिआँग तान आणि तेइन हाऊ हून जोडीने सुमीत रेड्डी आणि मनू अत्री जोडीवर २१-१४, २१-११ अशी मात केली.
एकेरीच्या दुसऱ्या लढतीत च्योंग वेई फेंगने पारुपल्ली कश्यपचा २१-१३, २१-६ असा धुव्वा उडवला. दुहेरीच्या दुसऱ्या लढतीत व्ही.शेम गोह आणि वी किआँग तान जोडीने अक्षय देवलकर-प्रणव चोप्रा जोडीवर १७-२१, २१-१४, २१-१४ असा विजय मिळवला. शेवटच्या लढतीत आरएमव्ही गुरुसाईदत्तने डॅरेन लिअूला १८-२१, २१-१३, २१-१९ असे नमवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2014 7:23 am

Web Title: uber cup saina nehwal co rout canada 5 0 in opener
टॅग : Saina Nehwal
Next Stories
1 अर्सेनेल अजिंक्य
2 केनियाचे वर्चस्व
3 फक्त विश्वचषकवारी!
Just Now!
X