जयपूर येथे सुरू असलेल्या महिला आयपीएल स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात मिताली राजच्या व्हलॉसिटी संघाने ट्रेलब्लेझर्स संघावर विजय मिळवला आहे. स्मृती मानधनाच्या नेतृत्वात प्रथम फलंदाजी करताना ट्रेलब्लेझर्सने निर्धारित 20 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 112 धावा केल्या होत्या. व्हेलॉसिटी संघाने 113 धावांचे आव्हान 18 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात पार केले.

प्रथम फलंदाजी करताना हर्लिन देओलच्या 46 धावांच्या बळावर ट्रेलब्लेझर्स संघाने112 धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार स्मृती मानधना आणा सारा टेलर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरल्या. व्हेलॉसिटीकडून एकता बिस्ट आणि एसी केर यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

ट्रेलब्लेझर्सने दिलेले 113 धावांचे आव्हान व्हेलॉसिटीने डॅनियल वॅट आणि शेफाली वर्मा यांच्या दमदार खेळीच्या बळावर 18 षटकांत पार केले. डॅनियल वॅटने 46 तर शेफाली वर्मानं 34 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. ट्रेलब्लेझर्सच्या दिप्ती शर्माने अचूक टप्यावर गोलंदाजी करत चार बळी मिळवले.