09 December 2019

News Flash

VIDEO: अनुष्काशी पॅचअपच्या प्रश्नावर पत्रकाराला काय बोलला विराट कोहली

विराटने प्रश्न विचारणाऱ्या पत्रकार तरूणीला तुझे खासगी जीवन कसे सुरू आहे, असा प्रश्न विचारला.

Virat Kohli Anushka Sharma late night dinner

भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने नुकत्याच झालेल्या एका पत्रकारपरिषदेत त्याच्या खासगी जीवनाविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संबंधित पत्रकाराला योग्य शब्दात समज दिली. काही दिवसांपूर्वी विराट आणि त्याची प्रेयसी अनुष्का शर्मा मुंबईतील एका हॉटेलमध्ये भेटले होते. तेव्हा या दोघांमध्ये पॅचअप झाल्याची चर्चा रंगली होती. हाच धागा पकडत एका पत्रकार तरूणीने विराटला अनुष्काविषयी विचारले. अनुष्का आणि तुझा पॅचअप झाला आहे, ही गोष्ट खरी आहे का?, असा प्रश्न या तरूणीने विराटला विचारला. त्यावेळी विराटने मी यासंबंधी काहीही बोलू इच्छित नसल्याचे स्पष्ट केले. मी तुम्हाला माझ्या खासगी जीवनाविषयी प्रश्न विचारण्याची मुभा दिली असली तरी, प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजायला पाहिजे असे नाही. त्यामुळे मी याविषयी काहीही बोलणार नाही. मजेशीर गोष्ट म्हणजे यानंतर विराटने प्रश्न विचारणाऱ्या पत्रकार तरूणीला तुझे खासगी जीवन कसे सुरू आहे, असा प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना पत्रकार तरूणीने तिचे खासगी जीवन मजेत सुरू असल्याचे सांगितले. तेव्हा आम्ही तुझ्यासाठी आनंदी आहोत, असे विराटने म्हटले.

First Published on April 26, 2016 2:43 pm

Web Title: virat kohli snubs reporter when asked about patch up with anushka sharma
Just Now!
X