News Flash

What a catch..! इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत विराटने घेतला ‘सुपरझेल’

पाहा व्हिडिओ

पुण्याच्या गहुंजे मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने अफलातून झेल घेतला. इंग्लंडच्या फलंदाजीदरम्यान विराटने सूर मारत एकहाती झेल टिपत सर्वांना थक्क केले. विराटचा हा झेल सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

डेव्हिड मलानला सोडले तर, इंग्लंडची फलंदाजांची वरची फळी सपशेल अपयशी ठरली. भारत इंग्लंडला लवकर गुंडाळणार असे वाटत असताना आदिल रशिद आणि सॅम करन यांनी झुंज दिली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत विराटचे टेंशन वाढवले. त्यानंतर विराटने 40व्या षटकात शार्दुलकडे चेंडू दिला. शार्दुलनेही विराटचा विश्वास सार्थ ठरवत आदिल रशिदला बाद केले. विराटने रशिदचा ऑफ साईडला अफलातून झेल टिपला. हा झेल इतका भन्नाट होता, की विराटलाही थोडा वेळ आश्चर्य वाटले.

 

भारताचा डाव –

रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी मागच्या सामन्यातील फॉर्म कायम राखत टीम इंडियासाठी शतकी सलामी दिली. धवनने आक्रमक फटकेबाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. दोघे संघासाठी मोठी भागीदारी रचणार असे वाटत असताना आदिल रशीदने रोहितला बाद केले. रोहित 37 धावांचे योगदान देऊन माघारी परतला. रोहित बाद झाल्यानंतर शिखर धवनही जास्त वेळ टिकला नाही. त्यानंतर विराट-राहुल मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. मधल्या फळीतील पडझडीनंतर ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्याने भारताचा डाव सांभाळला. पंतने 5 चौकार आणि 4 षटकारांसह 78 धावा केल्या. हार्दिकने 5 चौकार आणि 4 षटकारांसह 64 धावांची खेळी केली. त्यानंतर मुंबईकर शार्दुल ठाकूरने 3 षटकार आणि एका चौकारासह झटपट 30 धावांची खेळी केली. शार्दुलंनतर कृणालही 25 धावांचे योगदान देऊन बाद झाला. रीस टॉप्लेने भूवनेश्वर कुमारला बाद करत भारताचा डाव 48.2 षटकात 329 धावांवर संपुष्टात आणला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2021 9:35 pm

Web Title: virat kohli takes stunner in third odi against england adn 96
Next Stories
1 षटकार ठोकल्यानंतर स्टोक्सने तपासली शार्दुलची बॅट!
2 भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू म्हणतो, ”कृणाल वनडेचा गोलंदाज नाही”
3 तिरंग्यावर सही देण्यास नकार देत मराठमोळ्या अजिंक्यनं जिंकली मनं; व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X