कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतकी खेळी करणं हे खूप मोठी बाब असते. आतापर्यंत २७ फलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक ठोकण्याची किमया साधली आहे. पण भारताकडून केवळ दोनच फलंदाजांना त्रिशतक ठोकता आले. तडाखेबाज माजी फलंदाज विरेंद्र सेहवागने दोन वेळा तर करूण नायरने एकदा त्रिशतक केले. त्यामुळे भारताच्या खात्यात सध्याच्या घडीला तीन कसोटी त्रिशतके जमा आहेत. आणखी एक त्रिशतकदेखील भारताच्या नावे झाले असते, पण भारताचा दिग्गज कसोटीपटू राहुल द्रविडमुळे एक त्रिशतक हुकल्याचे सेहवागने एका टॉक शो मध्ये म्हटले होते.

सचिनने खास फोटो ट्विट करत दिल्या ‘महाराष्ट्र दिना’च्या शुभेच्छा

सेहवाग हा कायम तडाखेबाज खेळी करण्यासाठी ओळखला जातो. त्याने कसोटी कारकिर्दीतदेखील जी दोन त्रिशतके ठोकली, ती दमदार फटकेबाजीच्या बळावरच ठोकली होती. पण त्याचे एक शतक मात्र राहुल द्रविडमुळे होऊ शकले नाही, असे त्याने व्हॉट द डक या टॉक शो मध्ये सांगितले होते.

लाजिरवाण्या ११ खेळाडूंच्या यादीत मुंबईकर अजित आगरकरचं नाव; जाणकार, चाहते संतापले

सेहवाग म्हणाला होता, “मी श्रीलंकेविरूद्ध खेळत होतो. माझ्यासमोर नॉन-स्ट्राईकला राहुल द्रविड होता. प्रत्येक सत्राच्या थोडं आधी ‘जपून खेळा, विकेट जाऊ देऊ नका’ असे सांगायची द्रविडची सवय होती. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर आम्ही २००९ मध्ये खेळत होतो. दुसऱ्या दिवसाच्या खेळाचा शेवटचा टप्पा सुरू होता. मी २८४ धावांवर खेळत होतो, तेव्हा द्रविड माझ्याजवळ येऊन म्हणाला की विकेट जाऊ देऊ नकोस, दिवसाचा केवळ २-३ षटकांचाच खेळ शिल्लक आहे. आता टिकलास, तर उद्या येऊन तू त्रिशतकच काय… ४००, ५०० धावांचा टप्पाही गाठू शकतोस.”

भारतीय क्रीडाक्षेत्राला धक्का! यजमानपदाचे हक्क गमावण्याची नामुष्की

“द्रविडचे ते शब्द ऐकल्यावर मी त्याला स्पष्ट सांगितले की जर तुला वाटत असेल की नाबाद राहावं तर उरलेली तीनही षटके तुच खेळून काढ. त्याने माझं ऐकलं आणि तीन षटके खेळून काढली. पण त्यानंतर पुढच्या दिवशी जेव्हा मी खेळायला मैदानात उतरलो. तेव्हा ती लय मिळेपर्यंत नेमका मी बाद झालो. त्या दिवशी जर मी द्रविडचं ऐकलं नसतं, तर त्या तीन षटकात मी आवश्यक १६ धावा ठोकून मोकळा झालो असतो”, असे सेहवागने तेव्हा सांगितले होते.