News Flash

प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व गमावले-सचिन

केवळ क्रिकेट नव्हे तर साऱ्या क्रीडा क्षेत्राने प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व गमावले आहे अशा शब्दांत भारताचा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने दक्षिण आफ्रिकेचे दिवंगत नेते नेल्सन मंडेला यांना

| December 7, 2013 02:32 am

केवळ क्रिकेट नव्हे तर साऱ्या क्रीडा क्षेत्राने प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व गमावले आहे अशा शब्दांत भारताचा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने दक्षिण आफ्रिकेचे दिवंगत नेते नेल्सन मंडेला यांना श्रद्धांजली वाहिली.
सचिन याने ट्विटरद्वारे दिलेल्या संदेशात म्हटले आहे, मी जेव्हा मंडेला यांना भेटलो होतो, त्यावेळी त्यांनी मला अतिशय मौलिक मार्गदर्शन केले होते. ही भेट माझ्यासाठी अतिशय संस्मरणीय होती. त्यांचा प्रत्येक शब्द मला प्रोत्साहन देणारा होता. ते आज हयात नसले तरी माझ्या हृदयात ते सदोदित असतील.
महंमद अली, ज्येष्ठ बॉक्सर- सर्वावर प्रेम करण्याची शिकवण देणारा महान नेता जगाने गमावला आहे.
सेप ब्लॅटर, फिफा प्रमुख- आमच्या काळातील सर्वात श्रेष्ठ माणूस आपल्यातून नाहीसा झाला आहे. त्यांची शिकवण सदोदित प्रेरणादायी राहील.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी अ‍ॅडलेड कसोटीदरम्यान दक्षिण आफ्रिकेचे दिवंगत नेते नेल्सन मंडेला यांना श्रद्धांजली वाहिली. अ‍ॅडलेड मैदान व्यवस्थापनाच्या वतीनेही मंडेला यांना प्रतीकात्मक श्रद्धांजली वाहण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2013 2:32 am

Web Title: we lost the inspiring personality sachin
Next Stories
1 क्लार्क, हॅडिनच्या शतकांसह ऑस्ट्रेलियाचा धावांचा डोंगर
2 मुंबई शहर, ठाणे बाद फेरीत
3 सिंधू संस्कृती!
Just Now!
X