News Flash

टीम इंडियात सर्वात वाईट डान्सर कोण? खेळाडू म्हणतात…

खेळाडूंनी दिली धमाल उत्तरं

भारतीय संघाने पहिला सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यात विंडीजने दमदार पुनरागमन केले. सिमन्सच्या नाबाद अर्धशतकी खेळाच्या जोरावर दुसऱ्या टी २० सामन्यात भारतावर मात केली. ८ गडी राखून मिळवलेल्या या विजयासह वेस्ट इंडीजने मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. या सामन्यानंतर रोहित शर्मा याने कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यात रोहितने दोघांनाही एक प्रश्न विचारला. त्यावर दोघांनीही एकच उत्तर दिले.

VIDEO : टीम इंडियाची धमाल-मस्ती… कुलदीपने केली शमीची भन्नाट नक्कल

नेहमी चहल टीव्हीच्या माध्यमातून संघातील खेळाडूंना प्रश्न विचारले जातात. पण यावेळी रोहित शर्माने कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांना झकास प्रश्न विचारले. त्यात संघातील सर्वात वाईट डान्सर कोण? असा प्रश्न दोघांनाही विचारण्यात आला. त्यावर बोलताना युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी शिवम दुबेचे नाव सांगितले. तसेच त्याला वाईट डान्सर ठरवण्यामागचे कारणदेखील सांगितले.

Video : पॅड बांधून फिल्डिंग अन् टिपला भन्नाट झेल

पहा व्हिडीओ –

…म्हणून पत्नीसाठी नव्हे, तर ‘तिच्या’साठी रोहितने काढली दाढी

याशिवाय सामन्यानंतर रोहित शर्मा याने कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारताना ‘तुम्हाला जर भारतीय संघातील एखाद्या खेळाडूची नक्कल करायची असेल तर तुम्ही कोणाची नक्कल कराल?’ असे विचारले. त्यावर चहलने रोहितचीच नक्कल केली, तर कुलदीप यादवने शमीच्या आवाजाची आणि लहेजाची हुबेहुब नक्कल केली. तसेच हैदराबाद शहराबद्दल काय आवडतं? संघातील सर्वात वाईट हेअसस्टाईल कोणाची? कोणत्या फलंदाजाला गोलंदाजी करायला आवडणार नाही? असेही काही प्रश्न रोहितने त्यांना विचारले.

भारताच्या पराभवानंतर अश्विन विंडीजच्या ‘या’ खेळाडूवर फिदा, म्हणाला…

दुसऱ्या सामन्यात भारताचा पराभव

दुसऱ्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाला १७० धावांवर रोखण्यात विंडीजचे गोलंदाज यशस्वी झाले. शिवम दुबेने सर्वाधिक धावा केल्या. पण रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत, जाडेजा हे फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. या आव्हानाचा पाठलाग करताना सिमन्स आणि एविन लुईस यांनी विंडीजला चांगली सुरुवात करुन दिली. त्यांनी ७३ धावांची भागीदारी केली. सिमन्सने नाबाद ६७ धावा केल्या आणि विंडीजला विजय मिळवून दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2019 4:34 pm

Web Title: who is bad dancer in team india players answer hilarious video funny video vjb 91
Next Stories
1 टी-२० विश्वचषकाला अद्याप अवकाश, विंडीजविरुद्ध मालिका विजय महत्वाचा !
2 VIDEO : टीम इंडियाची धमाल-मस्ती… कुलदीपने केली शमीची भन्नाट नक्कल
3 जहर भाई जहर ! केदार जाधवच्या फोटोवर रोहित शर्माची भन्नाट कमेंट
Just Now!
X