विंडीजच्या लेंडल सिमन्सच्या नाबाद अर्धशतकी खेळाच्या जोरावर दुसऱ्या टी २० सामन्यात भारतावर मात केली. विजयासाठी दिलेलं १७१ धावांचं आव्हान विंडीजने २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल चढवत विंडीजच्या फलंदाजांनी तिरुअनंतपुरमच्या मैदानावर फटकेबाजी केली. ८ गडी राखून मिळवलेल्या या विजयासह वेस्ट इंडीजने मालिकेत १-१ ने बरोबरी साधली.

Video : रवी शास्त्री भर मैदानात संजू सॅमसनला मारायला गेले आणि…

सामन्यात रोहितला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. पण त्या सामन्यानंतर मुलाखतीत रोहितने एक गोष्ट सांगितल्यामुळे तो चर्चेत आला आहे. कुलदीप यादव, युझवेंद्र चहल आणि रोहित शर्मा हे तिघे मैदानावर धमाल करत होते. रोहित शर्मा त्या दोघांना रॅपिड फायर फेरीचे प्रश्न विचारत होता. त्याचे प्रश्न संपल्यानंतर चहलने रोहितला दाढी काढून टाकण्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर रोहितने झकास उत्तर दिले. तो म्हणाला की माझी दाढी वाढलेली असेल, तर माझी मुलगी समायरा माझ्याशी खेळायला मागत नाही. ती माझ्या जवळ येत नाही. त्यामुळे मी तिच्यासाठी अखेर दाढी काढून टाकली आहे, असे रोहितने सांगितले.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: षटकारांच्या हॅटट्रिकनंतर धोनीने पुन्हा जिंकली मनं, हार्दिकची धुलाई केलेला चेंडू चाहतीला दिला भेट
MS Dhone fan buys 64000 tickets
मुलीच्या शाळेची फी भरली नाही, पण धोनीच्या चाहत्याने IPL तिकीटासाठी ६४ हजार खर्च केले
Andre Russell Closed His Ears as fans cheer when ms dhoni came to bat
IPL 2024: धोनीची एंट्री होताच जल्लोष टिपेला; आंद्रे रसेलने ठेवले कानावर हात- व्हीडिओ व्हायरल
chennai super kings vs kolkata knight riders match preview
IPL 2024 : विजयी पुनरागमनासाठी चेन्नई सुपर किंग्ज उत्सुक! आज अपराजित कोलकाताचे आव्हान; कर्णधारांच्या कामगिरीकडे लक्ष 

वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामन्यात रोहित झटपट बाद झाला. विशेषकरुन रोहित शर्माचं गेल्या काही सामन्यांपासून भारतीय मैदानांवरचं अपयश हे संघासाठी चिंताजनक ठरलं आहे. आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये भारतीय मैदानावर गेल्या ९ सामन्यांमध्ये एका सामन्याचा अपवाद वगळता रोहित शर्मा पूर्णपणे अपयशी ठरला आहे. बांगलादेशविरुद्ध राजकोट येथे झालेल्या सामन्यात केलेली ८५ धावांची खेळी ही त्याची गेल्या ९ सामन्यांमधील सर्वोत्तम खेळी आहे. त्या व्यतिरिक्त ८ सामन्यात त्याला २० धावांचा टप्पाही गाठता आलेला नाही. त्यामुळे आता रोहितच्या फॉर्मवरही साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सिमन्स आणि एविन लुईस यांनी विंडीजला चांगली सुरुवात करुन दिली. त्यांनी ७३ धावांची भागीदारी केली. सिमन्सने नाबाद ६७ धावा केल्या आणि विंडीजला विजय मिळवून दिला. त्याआधी, भारतीय संघाला १७० धावांवर रोखण्यात विंडीजचे गोलंदाज यशस्वी झाले. शिवम दुबेने सर्वाधिक धावा केल्या. पण रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत, जाडेजा हे फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत.