16 January 2021

News Flash

इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात विंडीजचा किमो पॉल जखमी

क्षेत्ररक्षण करताना घडला प्रकार

इंग्लंड आणि विंडीज यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. या कसोटी मालिकेत विंडीजने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील तिसरा सामना सुरु असून या सामन्यात विंडीजच्या कीमो पॉलला मैदानात क्षेत्ररक्षण करताना गंभीर दुखापत झाली. या दुखापतीनंतर तो मैदानावर पडला आणि त्याला स्ट्रेचरवरून थेट रुग्णालयात घेऊन जाण्यात आले.

कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होता. खेळाच्या चौथ्या षटकात शॅनन गॅब्रियल याने चेंडू टाकला. शॅननच्या गोलंदाजीवर जो डेन्लीने फटका लगावला. हा फटका अडवताना पॉलला दुखापत झाली. त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आणि त्याचे स्नायू ताणले गेल्याने त्याला उठताही आले नाही. विंडीज क्रिकेट मंडळाने याबाबत ट्विट करत माहिती दिली.

दरम्यान, दिवसाचा खेळ संपेपर्यंत पॉल मैदानावर आला नाही. त्याला झालेली दुखापत ही गंभीर स्वरुपाची असल्याचे समजते. त्यामुळे या सामन्यात त्याला खेळता येणार नाही. तसेच, पॉलला या दुखापतीमधून बाहेर येण्यासाठी जवळपास दीड महिना लागू शकतो, असे म्हटले जात आहे. त्यामुळे एकदिवसीय मालिकेलाही तो मुकण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2019 4:11 pm

Web Title: wi vs eng windies keemo paul suffers from hamstring injury goes out of the field on stretcher
Next Stories
1 Video : रोहित-रितिकाच्या चिमुकलीचं Cute Smile
2 ‘मुंबई रणजी क्रिकेट संघाच्या निवड प्रक्रियेत अनियमितता’
3 क्रिकेट संघात निवडलं नाही म्हणून प्रशिक्षकावर हल्ला करणारा अटकेत
Just Now!
X