आयर्लंडला पराभवाचा धक्का

विश्वाचषक फु टबॉल पात्रता सामन्यांत पोर्तुगाल आणि बेल्जियम संघांना प्रतिस्पध्र्यांनी बरोबरीत रोखले, तर आयर्लंडला पराभवाचा धक्का बसला. ख्रिस्तियानो रोनाल्डोचा गोल नाकारल्यामुळे पोर्तुगालला सर्बियाशी २-२ अशी बरोबरी पत्करावी लागली. याचप्रमाणे बलाढ्य बेल्जियमशी चेक प्रजासत्ताकने १-१ अशी बरोबरी साधली. परंतु लक्झेम्बर्ग संघाने आयर्लंडला १-० असे नमवून फु टबॉलजगताला हादरवले. नेदरलँड्सने लेव्हियाला २-० असे नामोहरम के ले, तर टर्कीने नॉर्वेचा ३_-० अशा फरकाने पराभूत के ले. रशियाने स्लोव्हेनियाचा २-१ असा पाडाव के ला.

पोर्तुगालच्या दिएगो जोटाने अनुक्र मे ११व्या आणि ३६व्या मिनिटाला गार करीत पोर्तुगालला पहिल्या सत्रात २-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सर्बियाच्या अ‍ॅलेक्झांडर मित्रोव्हिचने ४६व्या मिनिटाला सर्बियाचे खाते उघडले, तर ६०व्या मिनिटाला फिलिप कोस्टिचने संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर उत्तरार्धात गोलचा प्रयत्ना पंचांनी नाकारल्यामुळे संतापलेल्या रोनाल्डोने कर्णधाराचा आर्मबँड फे कू न दिला. टीव्ही रीप्लेमध्ये तो गोल असल्याचे स्पष्ट दिसत होते. परंतु विश्वाचषक पात्रता सामन्यांत गोलरेषा तंत्रज्ञान आणि व्हिडीओ आढावा घेण्याची पद्धत नसल्याने हा गोल सिद्ध हाऊ शकला नाही. सर्बियाचा बचावपटू निकोला मिलेनकोव्हचला धोकादायक पद्धतीने खेळाबाबत लाल कार्ड दाखवण्यात आले.

चेक प्रजासत्ताकच्या लुकास प्रोव्होडने ५०व्या मिनिटाला गोल करीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. परंतु रोमेलू लुकाकू ने ६०व्या मिनिटाला गोल करीत बेल्जियमला तारले. लुकाकू ने ९१व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात आपली गोलसंख्या ५९पर्यंत नेली आहे. आयर्लंड आणि लक्झेम्बर्ग सामन्यात ८५व्या मिनिटाला जेर्सन रॉड्रिगेझने के लेला गोल निर्णायक ठरला.