वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना उद्यापासून सुरु होत असून भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ आमनेसामने आहेत. इंग्लंडच्या साउथँप्टनमधील एजियास बाउल मैदानात हा सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी खास रणनिती तयार केली आहे. मात्र कोणते ११ खेळाडू मैदानात उतरतील याबाबत क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. कोण आत?, कोण बाहेर? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही जोडी आघाडीला मैदानात उतरेल. तर तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा फलंदाजीसाठी येईल. त्यानंतर कर्णधार विराट कोहली, पाचव्या क्रमांकावर अजिंक्य रहाणे, सहाव्या क्रमांकावर ऋषभ पंत, सातव्या क्रमांकावर रविंद्र जडेजा, आठव्या क्रमांकावर आर. अश्विन, नवव्या क्रमांकावर मोहम्मद शमी, दहाव्या क्रमांकावर इशांत शर्मा आणि अकराव्या क्रमांकावर जसप्रीत बुमराह असेल. कर्णधार विराट कोहली आणि संघ प्रशासन मोहम्मद सिराजला या संघात स्थान देण्यासाठी आग्रही आहेत. मात्र त्याला संघात स्थान मिळणं कठीण दिसत आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा  : अश्विन-जडेजा दोघांनाही खेळवावे!

दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्यामुळे त्यांना वातावरण आणि खेळपट्टीचा चांगला अंदाज आला आहे. न्यूझीलंडकडून टॉम लॉथम, डॅवोन कोनवे ही जोडी आघाडीला येईल. तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार केन विलियमसन, चौथ्या क्रमांकावर रॉस टेलर, पाचव्या क्रमांकावर विल यंग फलंदाजीसाठी येतील. तर सहाव्या स्थानावर यष्टीरक्षक फलंदाज वीजे वाटलिंगल मैदानात उतरेल. वाटलिंगचा हा शेवटचा कसोटी सामना असणार आहे. सातव्या क्रमांकावर कायल जेमिसन, आठव्या क्रमांकावर एजाज पटेल, नवव्या क्रमांकावर ट्रेंट बोल्ट, दहाव्या क्रमांकावर टिम साउथी आणि अकराव्या क्रमांकावर नील वॅगनर मैदानात उतरेल.

WTC Final: रिकी पॉटिंगचा विक्रम मोडण्याची विराट कोहलीला संधी

दोन्ही संघातील संभाव्य खेळाडू

भारत- रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, आर. अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह

न्यूझीलंड- टॉम लॉथम, डॅवोन कोनवे, केन विलियमसन (कर्णधार), रॉस टेलर, विल यंग, बीजे वाटलिंग (यष्टीरक्षक), एजाज पटेल, कायल जेमिसन, ट्रेंट बोल्ट, टिम साउथी आणि नील वॅगनर