News Flash

WTC Final: “विराट कोहली हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात ओव्हर रेटेड क्रिकेटपटू”

कसोटी क्रिकेटमध्ये जेमीससने विराटला बाद करण्याची ही तिसरी वेळ असून विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचं शतकं २०१९ मध्ये झळकावलं आहे

शेवटच्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर ३५ व्या चेंडूवर बाद झाला विराट. (फोटो ट्विटरवरुन साभार)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीच्या शेवटच्या दिवशी फलंदाजीसाठी मैदानात उतरलेले विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा दोघेही अर्ध्या तासामध्ये तंबूत परतले. या ऐतिहासित कसोटी सामन्यामध्ये विराटकडून शतकाची अपेक्षा काही चाहत्यांना होती. भारत पटापट धावा करुन न्यूझीलंडला शेवटचे काही तास खेळण्यासाठी देत सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल अशी अपेक्षा भारतीय चाहत्यांना होती. मात्र शेवटच्या दिवसाची सुरवात भारतासाठी फारशी चांगली झाली नाही. खेळ सुरु झाल्यानंतर विराट काही षटकांमध्येच माघारी परतला. त्यानंतर काही वेळात चेतेश्वर पुजाराही माघारी परतला. विराट झटपट बाद झाल्याने त्याच्यावर टीका केली जात आहे.

नक्की वाचा >> ICC Test Rankings: ‘हा’ भारतीय ठरला नंबर वन तर फलंदाजांमध्ये कोहलीसहीत ३ भारतीय Top 10 मध्ये

पाचव्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ३० षटकात २ बाद ६४ अशी धावसंख्या उभारली होती. तिथून पुढे खेळ सुरु झाल्यानंतर ३५ व्या चेंडूंला विराट तंबूत परतला. १३ धावा करुन कोहली तंबूत परतला. काईल जेमीसनने विराटला बीजे वॉटलिंगकरवी झेलबाद केलं. कसोटी क्रिकेटमध्ये जेमीससने विराटला बाद करण्याची ही तिसरी वेळ आहे. जेमीसनने विराटला कसोटीमध्ये एकूण ८४ चेंडू टाकले असून त्यामध्ये विराटने ३० धावा केल्यात. तर विराट तीन वेळा बाद झालाय. विराटचा जेमीसनविरोधीतील सरासरी ही अवघी १० इतकी आहे.

कोहली बाद झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्याकडून अधिक चांगल्या खेळाची अपेक्षा होती असं मत सोशल नेटवर्किंगवर व्यक्त केलं. सोशल नेटवर्किंगवर कोहली हा ट्रेण्डींग टॉपिक झाला. त्यातच श्रीलंकेमधील एक क्रिकेट वेबसाईट चालवणाऱ्या डॅनियल अॅलेक्झॅण्डरने केलेलं ट्विट चांगलंच चर्चेत आहे. डॅनियलने विराटची मागील दीड वर्षांमधील कामगिरी आपल्या ट्विटमध्ये सांगितली आहे.

नक्की पाहा >> मॅचचं मरु द्या… विराट कपड्यांसाठी नक्की कोणती पावडर वापरतो ते आधी सांगा; भन्नाट मिम्स व्हायरल

“१ जानेवारी २०२० पासून कसोटी क्रिकेटमधील विराट कोहलीची सरासरी २४.६४ इतकी आहे. आठ कसोटी सामने, १४ खेळी आणि ३४५ धावा. मागील ४१ इनिंगमध्ये विराटला एकही शतक झळकावता आलेलं नाही. २०१९ साली २३ नोव्हेंबर रोजी विराटने बांगलादेशविरोधात शेवटचं शतक झळकावलं होतं,” असं डॅनियलने म्हटलं आहे. इतकचं नाही तर, “विराट हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात ओव्हर रेटेड (अति कौतुक झालेला) क्रिकेटपटू आहे,” असा शेराही डॅनियलने दिलाय.

नक्की वाचा >> क्वारंटाइनमध्ये असणाऱ्या पृथ्वीच्या बेडवर दिसली अशी वस्तू की चाहत्यांनी केलं ट्रोल

आयसीसी रॅकिंगमध्ये विराटचा दबदबा

एकीकडे विराटवर टीका केली जात असतानाच दुसरीकडे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीचा शेवटच्या दिवसाचा खेळ सुरु होण्याच्या काही तास आधी घोषित करण्यात आलेल्या आयसीसी वर्ल्ड क्रिकेट रॅकिंगमध्ये विराट कसोटी, टी २० आणि एकदिवसीय सामने अशा सर्वच बाबतीत अव्वल १० च्या यादीत आहे. विराट कसोटी फलंदाजांच्या यादीत जागतिक क्रमवारीमध्ये चौथ्या स्थानी आहे, एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो फलंदाच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे तर टी-२० मध्ये पाचव्या स्थानी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 5:37 pm

Web Title: world test championship virat kohli most over rated cricketer in cricket history scsg 91
Next Stories
1 ICC Test Rankings: ‘हा’ भारतीय ठरला नंबर वन तर फलंदाजांमध्ये कोहलीसहीत ३ भारतीय Top 10 मध्ये
2 धक्का बसेल, पण कसोटीत सर्वाधिक षटकारांच्या विक्रमात ‘या’ दिग्गजांपूर्वी साऊदीचं नाव येतं!
3 WTC FINAL : दोन भारतीय प्रेक्षकांना काढले स्टेडियमबाहेर, जाणून घ्या कारण