Aakash Chopra Tweet Viral : ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या ओव्हल मैदानात झालेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यात भारताचा २०९ धावांनी पराभव केला. या विजयासोबत ऑस्ट्रेलिया आयसीसीच्या सर्व ट्रॉफी जिंकणारी पहिली टीम बनली आहे. या फायनलच्या पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी २८० धावांची आवश्यकता होती आणि टीम इंडियाच्या हातात सात विकेट्स होत्या. परंतु, भारतीय फलंदाजांनी लंचच्या आधीच ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर नांगी टाकली. त्यामुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामळे टीम इंडियाची आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची प्रतिक्षा आणखी वाढली आहे. भारतीय संघ या सामन्यात मागे कसा राहिला, याबाबत टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्राने ट्वीटच्या माध्यमातून सांगितलं आहे.

आकाश चोप्राने ट्वीट करत म्हटलं की, “गोलंदाजांसोबत समस्या नाहीय तर फलंदाजीमध्ये समस्या आहे. मागील काही वर्षांपासून गोलंदाजी खराब झालेली नाहीय. ही फक्त फलंदाजी आहे ज्यामुळे भारत मागे पडला आहे. मग कोणताही फॉर्मेट असो.” ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या या सामन्यात टीम इंडियाची टॉप ऑर्डर पूर्णपणे फ्लॉप ठरली. ऑस्ट्रेलियाचे फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेविस हेडने ज्याप्रमाणे आक्रमक फलंदाजी केली, टीम इंडियाचे टॉप ऑर्डरचे फलंदाज अशी कामगिरी करण्यात अपयशी ठरले. भारताने ७१ धावांवर पहिल्या इनिंगमध्ये ४ विकेट्स गमावले होते. रोहित शर्माने १५ तर गिलने १३, पुजारा १४ आणि कोहलीनेही १४ धावा केल्या होत्या.

नक्की वाचा – WTC फायनलमध्ये सलग दुसऱ्यांदा टीम इंडियाचा पराभव, नेमकं काय चुकलं? पराभवाची ‘ही’ पाच महत्वाची कारणे जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या इनिंगमध्ये ट्रेविस हेड आणि स्टीव्ह स्मिथने शतक ठोकलं. ट्रेविस हेड पहिल्या इनिंगमध्ये शतकी खेळी न करताच पॅव्हेलियनमध्ये परतला असता. परंतु, रहाणेनं त्याचा झेल ड्रॉप केला आणि टीम इंडियासाठी हे खूप महागात पडलं. कारण त्याने १६३ धावांची शतकी खेळी केली आणि पहिल्याच दिवशी टीम इंडियाला बॅकफूटला टाकलं. ट्रेविस हेडने या सामन्यात वेगानं धावा कुटल्या. पहिल्याच इनिंगमध्ये त्याने १७४ चेंडूत १६३ धावा कुटल्या.