AB de Villiers Eye Injury: एबी डिव्हिलियर्सने विस्डेन क्रिकेट साईटसह चर्चेत आपल्या आयुष्यातील कठीण दोन वर्षाच्या कालावधीविषयी भाष्य केले. करिअरमधील मागील दोन वर्ष तो डोळ्याच्या गंभीर दुखापतीसह क्रिकेट खेळला आहे असे त्याने सांगितले आहे. डिव्हिलियर्सने मे २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली मात्र अजूनही तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आयपीएल खेळतोय. २०१९ मध्ये तो कदाचित आणखी एक विश्वचषक खेळेल अशा चर्चा रंगत होत्या पण डिव्हिलियर्सने आपला निर्णय बदलला नाही.
आपली आंतरराष्ट्रीय निवृत्ती का मागे घेतली नाही याबद्दल डिव्हिलियर्स म्हणाला, “कोविडने नक्कीच निर्णयावर ठाम राहण्यात मोठी भूमिका बजावली, यात काही शंका नाही. आंतरराष्ट्रीय दृष्टीकोनातून, २०१५ च्या विश्वचषकाने मोठे नुकसान केले. त्यावर मात करायला मला थोडा वेळ लागला आणि नंतर, जेव्हा मी पुनरागमन करण्याचा विचार केला होता पण त्या वेळी मला गरजेची असलेली (क्रिकेटची) संस्कृती मला जाणवली नाही.
“मी अनेकदा विचार करत होतो, मला माहित नाही, हा माझ्या करिअरचा शेवट असू शकतो का? मला आयपीएल किंवा इतर काहीही खेळायचे नव्हते. 2018 मध्ये मी सर्व गोष्टींपासून दूर झालो, नंतर काही कसोटी क्रिकेट सामने खेळून पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलियाला सीरीजमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला पण मला माझ्यावर कोणताही स्पॉटलाइट नको होता. मला एवढेच म्हणायचे होते की, ‘माझा क्रिकेटमधील वेळ खूप छान होता, तुमचे खूप खूप आभार’.
मुलाने लाथ मारली आणि..
२०२१ च्या आयपीएलच्या वेळी डिव्हिलियर्सने त्याच्या निवृत्तीच्या फार काळ आधी झालेल्या डोळ्याच्या दुखापतीबद्दल सांगितले. तो म्हणाला, “माझ्या लहान बळाने चुकून माझ्या डोळ्यावर लाथ मारली. आणि तेव्हापासून माझ्या उजव्या डोळ्यातील दृष्टी कमकुवत होऊ लागली. जेव्हा माझी शस्त्रक्रिया झाली तेव्हा डॉक्टरांनीही मला विचारलं की, तू या स्थितीत क्रिकेट कसा खेळू शकलास, कसं शक्य आहे? माझ्या कारकिर्दीच्या शेवटच्या दोन वर्षात सुदैवाने माझ्या डाव्या डोळ्याने चांगले काम केले आहे.”