सेनादलाच्या हरिओम सिंगने ५८व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेतील ५० मीटर रायफल प्रोन विभागात सुवर्णवेध घेतला. शिवछत्रपती क्रीडानगरीत झालेल्या या स्पर्धेत हरिओमने अंतिम लढतीत २०५ गुण नोंदविले. उत्तर प्रदेशच्या आदित्य सिंग याने २०४.८ गुण नोंदवत रौप्यपदक मिळविले. अभिनव बिंद्राने प्रोन विभागात आपले कौशल्य अजमावताना १८३.८ गुण नोंदवले आणि कांस्यपदक पटकावले. सांघिक विभागात सेनादलाने १८५५.३ गुण नोंदवत सोनेरी कामगिरी केली. या संघात चैन सिंग, सुरेंद्रसिंग राठोड व सुशील कुमार यांचा समावेश होता. हवाई दल व उत्तर प्रदेश यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकाविले. कुमार गटात उत्तर प्रदेशने सुवर्णपदक जिंकले तर महाराष्ट्राला रौप्यपदक मिळाले. सेनादलाने कांस्यपदक पटकाविले.
संग्रहित लेख, दिनांक 18th Dec 2014 रोजी प्रकाशित
राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा : हरिओम सिंग विजेता, बिंद्राला कांस्यपदक
सेनादलाच्या हरिओम सिंगने ५८व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेतील ५० मीटर रायफल प्रोन विभागात सुवर्णवेध घेतला.

First published on: 18-12-2014 at 04:48 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhinav bindra wins bronze in shooting nationals gold for hariom singh