AB de Villiers says Suryakumar Yadav will get a chance in World Cup: बीसीसीआयच्या निवड समितीने नुकतीच विश्वचषक २०२३ साठी टीम इंडियाची घोषणा केली. अनेक अपेक्षित खेळाडू या संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले, तर काही अनुभवी खेळाडूंना स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले. तथापि, निवडकर्त्यांनी सूर्यकुमार यादववर विश्वास व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे त्याची एकदिवसीय क्रिकेटमधील आकडेवारी फारशी चांगली नाही. परंतु तरीही त्याला संघात स्थान दिले आहे. याबाबत एबी डिव्हिलियर्स आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स भारतीय संघ व्यवस्थापनाने सूर्यकुमार यादवला पाठिंबा दर्शवल्याने आनंदी आहे. तसेच त्याने सूर्यकुमार यादववर विश्वास दाकवल्याबद्दल कौतुक केले आहे. सध्या टी-२० क्रमावारीत सूर्यकुमार यादव अव्वल फलंदाज आहे. त्याची एकदिवसीय विश्वचषक २०२३ साठी निवड केल्याने, डिव्हिलियर्सने आपल्या यूट्यूब चॅनलवरील नवीन व्हिडीओत स्कायबद्दल आपले मत मांडले आहे.

Kevin Pietersen's big statement on Sanju Samson
IPL 2024 : “जर मी निवडकर्ता असतो तर…”, इंग्लंडचा माजी दिग्गज केविन पीटरसनचे संजू सॅमसनबाबत मोठं वक्तव्य
Boucher Pollard Argued With Umpire
MI vs CSK : चेन्नईविरुद्धच्या ‘लाइव्ह मॅच’मध्ये मुंबईच्या बाउचर, पोलार्ड आणि डेव्हिडने पंचांशी घातला वाद, पाहा VIDEO
Green signal for Suryakumar Yadav to play in IPL
IPL 2024 : मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! सूर्यकुमार यादव झाला तंदुरुस्त, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता
Manoj Tiwary criticizes Glenn Maxwell
IPL 2024 : मॅक्सवेलच्या फ्लॉप शोवर माजी भारतीय खेळाडूची सडकून टीका; म्हणाला, ‘तो वेळोवेळी फक्त पगार घेतोय पण…’

सूर्यकुमार यादवबद्दल बोलताना एबी डिव्हिलियर्स म्हणाला, “विश्वचषक संघात स्कायला पाहून मला बरे वाटते. तुम्हाला माहिती आहे की मी त्यांचा खूप मोठा चाहता आहे. मी टी-२० क्रिकेटमध्ये जसा खेळायचो, तसाच तो खेळतो. त्याला अद्याप एकदिवसीय क्रिकेटमध्ये यश मिळालेले नाही, परंतु हा एक छोटासा मानसिक बदल आहे, जो त्याला करणे आवश्यक आहे. त्याच्यात तसे करण्याची पूर्ण क्षमता आहे आणि मला आशा आहे की त्याला विश्वचषकात संधी मिळेल.”

हेही वाचा – Rohit Sharma: ‘जर मी हे करू शकलो, तर खूप मोठी गोष्ट असेल’; ख्रिस गेलच्या ‘या’ विक्रमावर रोहित शर्माची प्रतिक्रिया

विशेष म्हणजे, सूर्यकुमार यादव हा टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे, परंतु तो त्याच्या टी-२० फॉर्मला एकदिवसीय फॉर्मेटमध्ये रूपांतरित करू शकला नाही. याबद्दल बरीच चर्चा झाली आहे. अनेक तज्ञ आणि चाहते संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांच्याबद्दल सतत वादविवाद करत आहेत की टीम इंडियाचा भाग कोण असावा. तथापि, डिव्हिलियर्सला वाटते की सध्याचा टी-२० क्रिकेटमधील नंबर-1 फलंदाज एकदिवसीय फॉरमॅटमध्ये यश मिळवू शकतो.

आयसीसी एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.