AFG vs NZ Test Day 3 play abandoned without toss : अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामना सुरु होण्यास वारंवार विलंब होत आहे. ग्रेटर नोएडा येथील ग्रेटर नोएडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मैदानावर हा सामना खेळवला जाणार होता, मात्र तीन दिवसांपासून या सामन्यात नाणेफेकही झालेली नाही. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी पावसाने आणि खराब आउटफिल्डमुळे सामना सुरु होऊ शकल नाही, तर तिसऱ्या दिवशीही असेच झाले. रात्री फारसा पाऊस पडला नाही, मात्र तिसऱ्या दिवशी सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. यामुळे सामना अधिकाऱ्यांनी तिसऱ्या दिवसाचा खेळ तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच रद्द केला.

अशा प्रकारे तिसऱ्या दिवशीही नाणेफेक होऊ शकली नाही. आता परिस्थिती अशी आहे की हा सामनाच रद्द होऊ शकतो. हा सामना ९ सप्टेंबरपासून सुरू होणार होता, पण त्या रात्री पाऊस पडला त्यामुळे सामना वेळेवर सुरू झाला नाही. खेळपट्टी चांगली होती, पण आऊटफिल्डचा काही भाग जलमय झाला होता. ग्राउंडस्मननी खूप प्रयत्न केले, पण यश आले नाही. अनेकवेळा पंच आणि सामना अधिकाऱ्यांनी खेळपट्टी आणि मैदानाचा आढावा घेतला, परंतु अनेक वेळा पाहणी करूनही सामना सुरु होऊ शकला नाही.

Jasprit Bumrah Video gone viral in which he is angrily telling Mumbai Indians that he is a fast bowler
Jasprit Bumrah : ‘मी मीडियम पेसर नाही, फास्ट बॉलर’; मुंबई इंडियन्सच्या पोस्टने बुमराह भडकला, VIDEO व्हायरल
amazon river drying up
विश्लेषण: जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी पडतेय कोरडीठाक……
Vinesh Phogat slams PT Usha
Vinesh Phogat on PT Usha: “पीटी उषा यांनी गुपचूप फोटो घेतला आणि त्यानंतर राजकारण…”, विनेश फोगटचा मोठा आरोप
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?
IND vs BAN Basit Ali Slams Bangladesh Captain Najmul Hossain Shanto
IND vs BAN : ‘शांतोने भारताबरोबर ‘तो’ माईंड गेम खेळायला नको होता’, बासित अलीने बांगलादेशच्या कर्णधारावर साधला निशाणा
Sharad Pawar Reaction on Akshay Shinde Death
Sharad Pawar : “गृहविभागाने दाखवलेला हलगर्जीपणा…”, अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
Sunil Gavaskar slams Michael Vaughan for comment on Test cricket
Sunil Gavaskar Michael Vaughan : कसोटीत रुटने सचिनला मागे टाकले तर काय बदलेल? मायकेल वॉनच्या वक्तव्याला सुनील गावसकरांनी दिले चोख प्रत्युत्तर
dominican republic citizenship
पैसे नाहीत म्हणून ‘या’ देशानं नागरिकत्वच काढलं विकायला; किंमत लावली १ कोटी ७० लाख!

दुसऱ्या दिवशी ग्राउंडस्मन नवीन उपाय शोधून आले आणि जिथे पाणी आहे तिथे गवत आणि जमीन खोदली आणि सराव मैदानावर गवत लावले. मात्र, इतर भागात थोडे पाणी असल्याने आणि मैदान खेळण्यासाठी योग्य नसल्याने याचा फारसा फायदा झाला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही सामना रद्द करण्यात आला. सामना तिसऱ्या दिवशी सुरू होणे अपेक्षित होते, मात्र रात्री पावसामुळे मैदान पुन्हा ओले झाले होते.

हेही वाचा – IND vs BAN : गिल-जैस्वाल नव्हे तर ‘हा’ २६ वर्षीय खेळाडू भारताचा सर्वोत्तम कसोटी फलंदाज, सौरव गांगुलीचा दावा

अर्ध्याहून अधिक मैदान झाकले गेले होते, परंतु अनेक भाग पाण्याने व्यापले होते. याशिवाय तिसऱ्या दिवशी सामना सुरू होण्यापूर्वी मुसळधार पाऊस झाला आणि परिस्थिती आणखीनच बिकट झाली. त्यामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करावा लागला. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे की जर चौथ्या दिवशी परिस्थिती योग्य असेल तर सामना ९ वाजता सुरू होईल आणि ९८ षटकांचा खेळ होईल.