Suryakumar Yadav’s Insta story went viral : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना रविवारी पार पडला. जोहान्सबर्ग येथे झालेल्या सामन्या भारताने दक्षिण आफ्रिकेचा ८ गडी राखून पराभव केला. या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथम फलंदाजी करताना २७.३ षटकांत ११६ धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने १६.४ षटकांत २ गडी गमावून ११७ धावा करुन विजय नोंदवला. या सामन्यात अर्शदीप सिंगने पाच विकेट्स घेत विजयात महत्त्वाची भूमिका निभावली. यानंतर आता सूर्यकुमार यादवची इन्स्टा स्टोरी व्हायरल होता.

अर्शदीप सिंग टीम इंडियासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. अर्शदीप सिंगने १० षटकांत ३७ धावांत ५ फलंदाज बाद केले. यानंतर सूर्यकुमार यादवने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अर्शदीप सिंगचा फोटो पोस्ट केला. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले- ‘शेर सिंग राणा को हराएगा तू? है दम?’ आता सूर्याची ही इन्स्टा स्टोरी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये सूर्या अर्शदीपवर संतापलेला दिसत होता.

सोशल मीडिया व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सूर्यकुमार यादव टीम बसमध्ये अर्शदीपवर रागावताना दिसत आहेत. हा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. सूर्याचा हा संतापल्याचा व्हिडीओ एका चाहत्याने बाहेरून शूट करून इंटरनेटवर अपलोड केला. हा व्हिडिओ काही वेळातच व्हायरल झाला. सूर्या अर्शदीपला कशावरून तरी रागवत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र, सूर्याला कशामुळे राग आला हे स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा – IND vs SA 1st ODI : भारतीय गोलंदाजीपुढे यजमान सपशेल अपयशी! टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर आठ गडी राखून दणदणीत विजय

एकूण विक्रमाबद्दल बोलायचे झाल्यास, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५ बळी घेणारा अर्शदीप भारताचा चौथा गोलंदाज ठरला. याशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर ५ बळी घेणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी युजवेंद्र चहलने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५ विकेट्स घेतल्या होत्या.

हेही वाचा – IPL 2024 Auction : लिलावापूर्वी कोणत्या संघाकडे किती रक्कम आणि जागा शिल्लक? पाहा संपूर्ण यादी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एका डावात ५ विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज:

५/६ – सुनील जोशी, नैरोबी, १९९९
५/२२ – युजवेंद्र चहल, सेंच्युरियन, २०१८
५/३३ – रवींद्र जडेजा, कोलकाता, २०२३
५/३७ – अर्शदीप सिंग, जोहान्सबर्ग, २०२३