Virat Kohli and Rachin Ravindra Video Viral : आयपीएल २०२४ च्या पहिल्या सामन्यात आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली दीर्घ कालावधीनंतर मैदानात परतला. शुक्रवारी सीएसकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात कोहलीचा संघ आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला. कोहली मैदानावरील त्याच्या आक्रमक वृत्तीसाठी ओळखला जातो. अनेकवेळा तो मैदानावर शिवीगाळ करतानाही दिसला आहे. असाच काहीसा प्रकार बंगळुरु आणि चेन्नई यांच्यातील सामन्यादरम्यान रचिन रवींद्रला बाद केल्यानंतर घडला. सीएसकेच्या सलामीवीराला बाद केल्याने कोहली इतका खूश झाला की उत्साहात तो हातवारे करुन त्याला काही तरी म्हणताना दिसला. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आयपीएल २०२४ ची शुक्रवारी धमाकेदार सुरुवात झाली, जिथे पहिल्या सामन्यात धोनी आणि कोहली यांच्या संघांमध्ये लढत पाहायला मिळाली. हे दोन्ही दिग्गज खेळाडू आपापल्या संघाचे नेतृत्व करत नसले तरी कोहली आणि धोनी आमनेसामने असल्याने सामना खूपच रोमांचक होता. या सामन्यात कोहलीच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आरसीबीला कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि कोहलीने चांगली सुरुवात करून दिली, पण प्लेसिस बाद होताच आरसीबीचा डाव पूर्णपणे कोलमडला. मधल्या फळीतील फलंदाज अनुज रावत आणि दिनेश कार्तिक यांच्यातील महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे आरसीबीला १७३ धावांपर्यंत मजल मारता आली.

Sachin Tendulkar said that I was offered the captaincy by BCCI
Team India : ‘बीसीसीआयने कर्णधारपदाची ऑफर दिली होती पण धोनी…’, सचिन तेंडुलकरचं मोठं वक्तव्य
Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”
Raj Thackeray meets Salman khan
Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर
ajit pawar sharad pawar
विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांबरोबर एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, “साहेब जर आम्हाला…”

पहिल्याच सामन्यात रचिन रवींद्रने गाजवले वर्चस्व –

लक्ष्याचा पाठलाग करताना रचिन रवींद्र आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड यांनी सीएसकेला चांगली सुरुवात करून दिली. दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी ३८ धावा जोडल्या, मात्र त्यानंतर ऋतुराजने आपली विकेट गमावली. आयपीएलमध्ये पहिला सामना खेळणाऱ्या रचिनने दुसऱ्या बाजूने फटकेबाजी सुरु ठेवताना १५ चेंडूत ३ चौकार आणि तितकेच षटकार लगावत ३७ धावा केल्या. सातव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कर्ण शर्माने रचिनची विकेट घेतली.

हेही वाचा – IPL 2024 PBKS vs DC: रिव्ह्यू गमावला, कॅच सुटला, सामनाही हरले- अपघातापूर्वीच्या ऋषभ पंतच्या सामन्यात काय घडलं होतं?

कर्ण शर्माच्या चेंडूवर रचिनने स्लॉग स्वीप शॉट खेळला, पण डीप बॅकवर्ड स्क्वेअरवर उपस्थित असलेल्या रजत पाटीदारने त्याचा झेल घेतला. रचिन बाद होताच सीमारेषेवर उभ्या असलेल्या कोहलीला आनंदामुळे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही. रचिनला पॅव्हेलियनकडे परत असताना विराटने हातवारे करुन ड्रेसिंग रूमचा रस्ता दाखवायला सुरुवात केली. कोहलीची ही कृती कॅमेऱ्यात कैद झाली. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – IPL 2024 CSK vs RCB: ऋतुराज गायकवाडने सांगितला सामन्याचा टर्निंग पॉईंट, कॅप्टन्सीबद्दल बोलताना म्हणाला “अर्थातच माही भाई…”

विराट कोहलीच्या टी-२० क्रिकेटमध्ये १२ हजार धावा पूर्ण –

आरसीबी संघ हा सामना हरला असला तरी कोहलीसाठी हा सामना खास होता. कोहलीने या सामन्यात ६ धावा पूर्ण करताच, टी-२० क्रिकेटमध्ये १२ हजार धावा पूर्ण करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये ही कामगिरी करणारा कोहली जगातील सहावा फलंदाज आहे. त्याच्या आधी ख्रिस गेल, शोएब मलिक, किरॉन पोलार्ड, ॲलेक्स हेल्स आणि डेव्हिड वॉर्नर यांनी ही कामगिरी केली आहे.