रश्मिका मंदानाचा डीप फेक व्हिडीओ आणि कतरिनाचा डीपफेक फोटो व्हायरल झाला. त्याची चर्चा थांबते न थांबते तोच आता शुबमन गिलच्या बाबतही असाच प्रकार घडला आहे. रश्मिकाच्या त्या व्हिडीओवर अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. या सगळ्या गोष्टी घडत असतानाच शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर यांचा फोटो व्हायरल होतो आहे. मुळात हा फोटो या दोघांचा नाही. डीपफेक तंत्र वापरुन हा फोटो व्हायरल करण्यात आला आहे.

काय आहे शुबमन साराच्या व्हायरल फोटोचं सत्य?

जो फोटो व्हायरल झाला आहे त्या फोटोत सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल हे दोघंही छान हसताना दिसत आहेत. फोटोसाठी पोज देताना साराने शुबमनच्या गळ्यात हात टाकला आहे. मात्र प्रत्यक्षात हा फोटो मॉर्फ करण्यात आला आहे. कारण हा मूळ फोटो सारा आणि अर्जुन तेंडुलकर यांचा आहे. शुबमन आणि सारा यांच्यातल्या कथित अफेअरच्या बातम्या अनेकदा येत असतात. सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरु असते. तसंच २०२३ वर्ल्ड कपही सुरु आहे. अशात सारा तेंडुलकर आणि शुबमन गिलचा हा मॉर्फ केलेला फोटो व्हायरल होतो आहे. मात्र हा फोटो त्यांचा नाही. मागच्या तीन दिवसांमध्ये डीपफेकचा फटका बसलेला शुबमन गिल हा तिसरा सेलिब्रिटी ठरला आहे.

ipl 2024 dhruv jurel salute his father ekana stadium wins heart sanju samson rr vs lsg
PHOTO : मुलगा धुव्र जुरेलची प्रत्यक्ष खेळी पाहून गर्वाने फुलली सैनिक वडिलांची छाती; मुलाचीही अर्धशतकाद्वारे वडिलांना सलामी!
pune bhel seller old couple video viral
Pune : पुण्यासारखी माणुसकी कुठे सापडेल? भेळ विकणाऱ्या वृद्ध जोडप्याचा VIDEO होतोय व्हायरल
Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”

रश्मिकाच्या व्हिडीओत काय?

सध्या रश्मिका मंदानाचा एक मॉर्फ व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. याव्हिडीओत एक महिला लिफ्टमध्ये जाताना दिसत असून ती रश्मिका मंदाना असल्याचा दावा केला जातोय. प्रथमदर्शनी या व्हिडीओतील महिला रश्मिका मंदाना असल्याचा भास होतो. मात्र खरं पाहता ती महिला रश्मिका मंदाना नाही. मिळालेल्या माहितीनुसार व्हिडीओतील खऱ्या महिलेचे नाव झारा पटेल असून ती भारतीय वंशाची ब्रिटिश नागरिक आहे. डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून झारा पटेल यांच्या चेहऱ्यावर रश्मिका मंदानाचा चेहरा लावण्यात आला आहे. याच कारणामुळे सामान्य लोकांना व्हायरल व्हिडीओतील महिला ही रश्मिका मंदाना असल्याचा भास होतोय. अशाच प्रकारे कतरिनाचा एक फोटोही व्हायरल करण्यात आला आहे.

डीपफेक म्हणजे काय?

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केलेले हे एक एआय टूल आहे. या तंत्रज्ञानाला २१ व्या शतकातील फोटोशॉपिंग म्हणता येऊ शकते. डीपफेकमध्ये एआयचाच एक भाग असणाऱ्या ‘डीप लर्निंग’च्या मदतीने प्रत्यक्षात न घडलेल्या घटनेच्या प्रतिमांची निर्मिती करता येऊ शकते. डीपफेक या तंत्रज्ञानात व्हिडीओ किंवा फोटोमध्ये असलेल्या व्यक्तीची दुसऱ्या एखाद्या व्यक्तीशी अदलाबदल करता येऊ शकते. अगदीच सोप्या भाषेत एखादे उदाहरण द्यायचे झाले तर, एखाद्या प्रतिमेत किंवा व्हिडीओमध्ये प्रत्यक्ष तुम्ही हजर नसलात तरी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर तुमचा फोटो (प्रतिमा) या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने चपखलपणे लावता येतो. म्हणूनच या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात अश्लील डीपफेक व्हिडीओ तयार करण्यासाठी केला जात आहे. एखाद्या व्यक्तीचा चेहरा वापरून अश्लील दृक्-श्राव्य चित्रण, या माध्यमात केले जाते.