Ben Stokes said he did not feel any pain: ऐतिहासिक अॅशेस मालिकेला यावेळी धमाकेदार सुरुवात झाली आहे. एजबॅस्टन मैदानावर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने २ गडी राखून इंग्लंडचा दणदणीत पराभव केला. या विजयात पॅट कमिन्स आणि नॅथन लायनने महत्त्वाची भूमिका निभावली. आता ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या पराभवानंतर इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सच्या निर्णयावर नक्कीच प्रश्न उपस्थित होत आहेत.

इंग्लंडने कांगारूंना विजयासाठी २८१ धावांचे लक्ष्य दिले होते. कर्णधार पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांच्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने सामना जिंकला. दोघांनी नवव्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात इंग्लंडने आपला पहिला डाव ८ बाद ३९३ धावांवर घोषित केला होता. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात ३८६ धावांवर आटोपला. त्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात २७३ धावा केल्या आणि इंग्लंडसमोर २८१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ८ बाद २८२ धावा करत लक्ष्य गाठले.

मी एक संधी म्हणून पाहिले –

पहिल्या कसोटीतील पराभवानंतर बेन स्टोक्सने आपल्या निर्णयाबद्दल म्हणाला की, “मला कसलंही दु:ख नाही. मी एक संधी म्हणून पाहिले. दिवस संपायला २० मिनिटे शिल्लक राहिल्यास कोणत्याही फलंदाजाला फलंदाजी करायची नसते. कुणालाच माहीत नाही, कदाचित रूट आणि अँडरसन आऊट झाले असते, तर त्यावेळीही आमची तीच अवस्था पाहायला मिळाली असती.

हेही वाचा – Rahul Dravid: डब्ल्यूटीसी फायनलमधील पराभवानंतर भारताच्या कोचसाठी सर्वात मोठे आव्हान कोणते? ग्रॅम स्मिथने केला खुलासा

बेन स्टोक्स पुढे म्हणाला, “पराभवानंतरही आम्ही असेच खेळत राहू. मला माझ्या संघाचा अभिमान आहे की आम्ही हा कसोटी सामना ५ दिवस खेळू शकलो. या सामन्यात अनेक चढ-उतार आले. हा सामना मी कधीच विसरणार नाही. हरल्यावर दु:ख नक्कीच असते. पण आम्ही असेच खेळत राहू.” एजबॅस्टन कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात इंग्लंडने ८ बाद ३९३ धावा करून पहिला डाव घोषित केला. स्टोक्सच्या या निर्णयावर अनेक दिग्गजांनी निश्चितच आश्चर्य व्यक्त केले होते. पण याकडे आता इंग्लंड संघाची नवी रणनीती म्हणून पाहिले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आठ विकेट पडल्यानंतर कमिन्स-लायनने विजय मिळवून दिला –

एके काळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या आठ विकेटवर २२७ धावा होती. येथे त्यांना विजयासाठी ५४ धावा करायच्या होत्या. फक्त दोन विकेट्स शिल्लक असताना इंग्लंड जिंकेल असे वाटत होते. येथून कर्णधार पॅट कमिन्सने लायनसह डाव पुढे नेत संघाला विजय मिळवून दिला. कमिन्सने ७३ चेंडूत नाबाद ४४ धावा केल्या. त्याने चार चौकार आणि दोन षटकार मारले. नॅथन लायनने २८ चेंडूत नाबाद १६ धावा केल्या. त्याने दोन चौकार मारले.