After Vizag Test loss England Team head back to Abu Dhabi : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये १५ फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. सध्या मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२३-२५ च्या दृष्टिकोनातून ही मालिका खूप महत्त्वाची आहे आणि अशा परिस्थितीत दोन्ही संघ कोणतीही कसर सोडू इच्छित नाहीत. या मालिकेत इंग्लंडचा संघ दुसरी कसोटी हरल्यानंतर दुबईत परतला आहे.

वास्तविक, संघ आपल्या प्री-सीरीज बेस अबुधाबीला परत जात आहे. भारतात येण्यापूर्वी इंग्लंड संघाने अबुधाबीमध्ये काही दिवस घालवून मालिकेची तयारी केली होती. आता संघ पुन्हा तिकडे गेला आहे. याबाबत इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने माहिती दिली. इंग्लंडचा संघ अबुधाबी येथील सराव शिबिरानंतर १२ किंवा १३ फेब्रुवारीला राजकोट येथे तिसऱ्या कसोटीसाठी भारतात परतेल.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, खेळाडूंना विश्रांती हवी आहे आणि क्रिकेटपासून दूर वेळ घालवायचा आहे. अशा परिस्थितीत इंग्लिश खेळाडू एकत्र येऊन अबुधाबीमध्ये गोल्फचा आनंद लुटतील. यानंतर राजकोट कसोटीपूर्वी संघ भारतात परतेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीदरम्यान सुमारे १० दिवसांचे अंतर असल्याने इंग्लंड संघ विश्रांती घेणार आहे. भारतात येण्यापूर्वीच इंग्लिश संघाने अबुधाबीमध्ये कंडिशनिंग कॅम्प आयोजित करून जोरदार तयारी केली होती.

हेही वाचा – SA vs NZ 1st Test : केन विल्यमसनने कसोटी क्रिकेटमध्ये झळकावले ३१वे शतक, फॅब फोरमध्ये कोहली-रुटला टाकले मागे

तेथे त्यांनी भारतीय फिरकीपटू खेळवण्याची योजना आखली होती. त्यामुळे हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्यांना फायदा झाला होता. या सामन्यात इंग्लंडने भारताची २८ धावांनी पराभव केला होता. मात्र, दुसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विनच्या घातक गोलंदाजीने इंग्लिश फलंदाजांना उघडे पाडले. भारताने दुसरी कसोटी १०६ धावांनी जिंकली. बुमराहने पहिल्या डावात सहा आणि दुसऱ्या डावात तीन बळी घेतले.

हेही वाचा – IND vs ENG 2nd Test : भारताविरुद्धच्या पराभवानंतर बेन स्टोक्सने तंत्रज्ञानावर उपस्थित केले प्रश्न

दुसऱ्या सामन्यात काय घडले?

विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीबद्दल बोलायचे झाले तर, भारतीय संघाने पहिल्या डावात यशस्वी जयस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर ३९६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात २५३ धावा करून सर्वबाद झाला. भारताला पहिल्या डावात १४३ धावांची आघाडी मिळाली होती. गिलच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या डावात २५५ धावा केल्या आणि इंग्लंडसमोर ३९९ धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर भारताने इंग्लिश संघाला २९२ धावांत गुंडाळून सामना १०६ धावांनी जिंकला.

Story img Loader