Virat Kohli shared Photo on Instagram: आशिया चषक २०२३ सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. आशिया चषकाचा पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात ३० ऑगस्ट रोजी होणार आहे. भारतीय संघ २ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. टीम इंडिया आशिया कपच्या तयारीत व्यस्त आहे. टीम इंडियाचे प्रशिक्षण शिबिर अलूरमध्ये आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासह अनेक वरिष्ठ क्रिकेटपटूंनी हजेरी लावली होती. सराव शिबिरानंतर कोहलीने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.

विराट कोहलीने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सेल्फी घेतलेला एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “कॅम्पचा सीझन 1 संपला आहे.” कोहलीही थम्स अपचे चिन्ह देताना दिसत आहे. त्याचबरोबर या फोटोमध्ये कोहली खूपच रिलॅक्स दिसत आहे.

आलूर येथील सहा दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न –

आशिया चषक स्पर्धेसाठी अलूर येथे सहा दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विराट कोहली, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांनी गुरुवारी या शिबिरात यो-यो चाचणी उत्तीर्ण केली. विराट कोहलीने यो-यो टेस्टचा स्कोअरही शेअर केला. यो-यो चाचणीत विराट कोहलीने १७.२ गुण मिळवले. ही यो-यो चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी १६.५ गुणांची अट होती. वेस्ट इंडिजहून परतल्यानंतर आयर्लंड दौऱ्यावर न गेलेल्या खेळाडूंचा या शिबिरात समावेश होता. कोहलीशिवाय रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे खेळाडूही सराव शिबिराचा भाग झाले.

हेही वाचा – मादागास्करमध्ये IOIG गेम्सच्या उद्घाटन समारंभात चेंगराचेंगरीत १२ ठार, तर ८० लोक जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आशिया कपमध्ये विराट कोहलीचा उत्कृष्ट विक्रम –

विराट कोहलीने आशिया कपमध्ये खूप धावा केल्या आहेत. गेल्या मोसमातही कोहलीने आशिया कपमध्ये वर्चस्व गाजवले होते. विराट कोहलीने आशिया कपमध्ये आतापर्यंत एकूण १९ (वनडे आणि टी-२०) सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने १०४२ धावा केल्या आहेत. कोहलीने एकदिवसीय फॉर्मेटमध्ये ६१.३० च्या सरासरीने ६१३ धावा केल्या, तर टी-२० फॉरमॅटमध्ये त्याने ९ सामन्यात ८५.८० च्या सरासरीने ४२९ धावा केल्या.