Ambati Rayudu Resignation from YSR Party : भारताचा माजी फलंदाज अंबाती रायुडूला राजकारण आवडत नव्हते. तो या खेळपट्टीवर दोन आठवडेही टिकू शकला नाही. २८ डिसेंबर रोजी वायएसआर काँग्रेस पक्षात सामील झालेल्या अंबाती रायुडूने ६ जानेवारी रोजी राजीनामा दिला. पक्ष सोडत असून अल्पकाळ राजकारणापासून दूर राहण्याची घोषणा त्यांनी शनिवारी केली. त्याच्या अचानक घेतलेल्या निर्णयामागील कारण न सांगता रायुडू म्हणाला की तो योग्य वेळी त्याच्या पुढील वाटचालीची घोषणा करेल.

चेन्नई सुपर किंग्जच्या क्रिकेटपटू अंबाती रायुडूने एक्सवर एक पोस्ट शेअर करुन याबाबत माहिती दिली. त्याने लिहले,”मी सर्वांना कळवू इच्छितो की, मी वायएसआर पक्ष सोडण्याचा आणि काही काळ राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील निर्णय योग्य वेळी कळवले जातील.”

IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals today match sport news
दिल्लीची आज गुजरातशी गाठ
rishbh pant
Ipl 2024, LSG vs DC: दिल्लीला कामगिरीत सुधारणेची आशा! आज लखनऊ सुपर जायंट्सचे आव्हान; राहुल, पंतकडे लक्ष
Rohit sharma speech in Mumbai Indians Dressing Room Video MI vs DC
IPL 2024: ‘वैयक्तिक कामगिरी, विक्रम फारसे महत्त्वाचे नाहीत…’, रोहित शर्माने मुंबईच्या विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंशी साधला संवाद
Today Mumbai Indians vs Delhi Capitals match in Indian Premier League IPL MI VS DC 2024 sport news
Ipl match, DC vs MI: मुंबईला विजयी लय सापडणार? आज घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान; हार्दिक, सूर्यकुमारकडे लक्ष

जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत केला होता पक्ष प्रवेश –

अंबाती रायुडूने मे २०२३ मध्ये इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चेन्नई सुपर किंग्जच्या विजयानंतर निवृत्त घेतली होती. त्याने गेल्या आठवड्यात आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआर पक्षात प्रवेश केला होता. मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी, उपमुख्यमंत्री के नारायण स्वामी आणि राजमपेट लोकसभा सदस्य पी मिथुन रेड्डी यांच्या उपस्थितीत त्याने पक्षात प्रवेश केला होता.

हेही वाचा – INDW vs AUSW 1st T20 : स्मृती मंधानाने केला मोठा पराक्रम, रोहित-विराटच्या ‘या’ खास क्लबमध्ये झाली सामील

पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाचा सदस्य राहिला –

अंबाती रायुडूला पाच वेळा आयपीएल ट्रॉफी उचलण्याची संधी मिळाली आहे. तो २०१३, २०१५ आणि २०१७ मध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य होता. याशिवाय, २०१८ आणि २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विजेते झाले तेव्हा तो धोनीसोबत होता.

हेही वाचा – Ranji Trophy 2024 : चेतेश्वर पुजाराचे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर, सौराष्ट्रकडून खेळताना झळकावले शानदार अर्धशतक

अंबाती रायुडूची कारकीर्द –

अंबाती रायुडूने एकदिवसीय क्रिकेटमध्येही भारतासाठी चांगली कामगिरी केली. देशासाठी ५५ सामने खेळणाऱ्या अंबाती रायडूने ५० डावात ४७.०६ च्या उत्कृष्ट सरासरीने १६९४ धावा केल्या. या काळात त्याचा स्ट्राइक रेट ७९.०५ राहिला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने तीन शतके झळकावली. १२४ धावा ही त्याची सर्वात मोठी धावसंख्या होती. या काळात त्याच्या बॅटमधून १० अर्धशतकेही झळकली. त्याचबरोबर ६ टी-२० सामन्यांच्या ५ डावात ४२ धावा केल्या आहेत. तसेच आयपीएलमध्ये २०३ सामन्यात १८७ डावात ४३४८ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एका शतकाचा आणि २२ अर्धशतकांचा समावेश आहे.