scorecardresearch

NASA मध्ये पोहोचले क्रिकेट; स्पेस सेंटरमध्ये लॉन्च होणार अमेरिकेची क्रिकेट लीग

Major League Cricket: अमेरिकेची मेजर लीग क्रिकेट १९ मार्च रोजी सुरू होणार आहे. ह्युस्टन येथील नासा स्पेस सेंटरमध्ये लॉन्च होणाऱ्या या लीगमध्ये सहा संघ सहभागी होणार आहेत.

America's Major League Cricket will be launched NASA Space Center in Houston
मेजर लीग क्रिकेट (फोटो-संग्रहित छायाचित्र जनसत्ता)

अमेरिकेचे मेजर लीग क्रिकेट (MLC) १९ मार्च रोजी ह्यूस्टनमधील नासा स्पेस सेंटरमध्ये लॉन्च होईल. जुलैमध्ये खेळल्या जाणार्‍या फ्रँचायझी-आधारित टी-२० स्पर्धेत सहा संघांचा समावेश आहे. ज्यामध्ये न्यूयॉर्क, वॉशिंग्टन डीसी, डॅलस, सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजेलिस आणि सिएटलमधील प्रत्येकी एक संघ सहभागी होईल. स्पर्धेचा पहिला हंगाम १८ दिवसांचा असेल आणि डॅलस आणि मॉरिसविले येथील एमएलसी मैदानावर खेळवला जाईल.

क्रिकबझच्या अहवालानुसार, मेजर लीग क्रिकेटच्या पहिल्या सत्रात प्रत्येक संघ पाच लीग सामने खेळेल. संघाची टीम पर्स सुमारे US$750,000 (६ कोटींहून अधिक) असेल. हे दक्षिण आफ्रिकन लीग एसए-टी२० आणि यूएच्या आयएल टी-२० च्या प्रति सामन्याच्या सरासरी पगाराच्या जवळपास आहे.

या लीगमध्ये अनेक मोठे क्रिकेट स्टार दिसणार –

ही स्पर्धा अशा वेळी होणार आहे, जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) एफटीपीमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, पाकिस्तान आणि न्यूझीलंडसाठी मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने नाहीत. अशा परिस्थितीत जगातील अनेक क्रिकेट स्टार या लीगमध्ये खेळताना दिसू शकतात.

मेजर लीग क्रिकेटचे विधान –

मेजर लीग क्रिकेटचे संचालक जस्टिन गेली म्हणाले, “मेजर लीग क्रिकेटच्या पहिल्या सत्रात, जगभरातील अनेक सर्वोत्तम T20 खेळाडू अमेरिकेतील प्रतिभावान खेळाडूंसोबत खेळताना दिसतील. ह्यूस्टनमधील स्पेस सेंटरमध्ये १९ मार्च रोजी ड्राफ्ट इवेंटनंतर संघ पुढे जाताना पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

हेही वाचा – IND vs AUS: ‘किमान इथल्या खेळपट्ट्यांमुळे खेळाडूंचा जीव जात नाही…’; सुनील गावसकरांनी ऑस्ट्रेलियाला काढला चिमटा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना स्थानिक खेळाडू मानले जाणार-

मेजर लीग क्रिकेटने कोणत्याही संघाच्या संघात सात परदेशी खेळाडूंना परवानगी दिली आहे. कोरी अँडरसन, सामी अस्लम, उन्मुक्त चंद यांसारख्या खेळाडूंचा समावेश असणार आहे. तसेच इतर देशांतून आलेल्या आणि अमेरिकेत खेळणाऱ्या खेळाडूंना स्थानिक क्रिकेटपटू म्हणून ड्राफ्टमध्ये स्थान दिले जाईल.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 18:26 IST
ताज्या बातम्या