भारताचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद याला टाटा स्टील करंडक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतील नवव्या फेरीत पीटर लेको याने बरोबरीत रोखले. त्यामुळे आनंदचे दुसरे स्थान कायम राहिले आहे. नॉर्वेचा खेळाडू मॅग्नस कार्लसन याने चीनच्या यिफान होऊवर मात करीत आघाडीचे स्थान आणखीनच बळकट केले आहे. त्याने अन्य खेळाडूंपेक्षा एक गुणाचे आधिक्य घेतले आहे. त्याचे सात गुण झाले असून आनंदचे सहा गुण झाले आहेत. लिवॉन आरोनियन (अर्मेनिया) व हिकारू नाकामुरा (अमेरिका) यांनी प्रत्येकी साडेपाच गुणांसह तिसरे स्थान घेतले आहे. त्यांनी अनुक्रमे एर्विन अलअमी व अनिष गिरी यांना बरोबरीत रोखले. भारताचा ग्रँडमास्टर पी.हरिकृष्ण याने स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करताना रशियाच्या सर्जी कर्झाकिन याला बरोबरीत रोखले. त्याचे पाच गुण झाले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jan 2013 रोजी प्रकाशित
नवव्या फेरीत आनंदची पीटर लेकोशी बरोबरी
भारताचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद याला टाटा स्टील करंडक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतील नवव्या फेरीत पीटर लेको याने बरोबरीत रोखले. त्यामुळे आनंदचे दुसरे स्थान कायम राहिले आहे. नॉर्वेचा खेळाडू मॅग्नस कार्लसन याने चीनच्या यिफान होऊवर मात करीत आघाडीचे स्थान आणखीनच बळकट केले आहे.
First published on: 24-01-2013 at 04:03 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand draws with leko in ninth round