scorecardresearch

माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे आयपीएलमध्ये पुनरागमनाच्या तयारीत

दिल्ली डेअरडेविल्स संघाचं मार्गदर्शकपद मिळण्याची शक्यता

भारतीय संघाचा माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे (संग्रहीत छायाचित्र)
भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे आयपीएलमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अनिल कुंबळे यांची दिल्ली डेअरडेविल्स संघासोबत चर्चा सुरु असून, सर्व गोष्टी ठरवल्याप्रमाणे झाल्यास अनिल कुंबळे आगामी हंगामात दिल्लीच्या संघाचे मार्गदर्शन म्हणून काम करताना दिसू शकतात. २०१८ साली झालेल्या आयपीएलमध्ये दिल्लीचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर राहिला होता.

आम्ही सध्या अनिल कुंबळेसोबत चर्चा करत असून, ते मार्गदर्शक म्हणून काम करण्यासाठी तयार झाल्यास आम्हाला नक्कीच आनंद होईल, अशी प्रतिक्रीया दिल्लीचे संघमालक पार्थ जिंदाल यांनी दिली आहे. दिल्ली संघाशी करार झाल्यास अनिल कुंबळे रिकी पाँटींगसोबत संघाला मार्गदर्शन करताना दिसतील. याआधीही २०१५ सालात कुंबळे आणि पाँटींग यांनी मुंबई इंडियन्स संघाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी पार पाडली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरव गांगुलीने दिल्लीच्या संघ व्यवस्थापनाला मार्गदर्शक पदासाठी कुंबळेचं नाव सुचवलं. त्यामुळे आगामी हंगामात कुंबळे आपली नवीन इनिंग दिल्लीसोबत सुरु करतात का याकडे सर्वांचं लक्ष असेल.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anil kumble in talks with delhi daredevils for mentor role in ipl

ताज्या बातम्या