पाकिस्तान-श्रीलंका कसोटी मालिका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिल्या चारही फलंदाजांनी झळकावलेल्या शतकांनंतर किशोरवयीन नसीम शाहने (३/३१) केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसह मालिका विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे.

पाकिस्तानने शनिवारच्या ३ बाद ३९५ धावांवरून पुढे खेळताना कर्णधार अझर अली (११८) आणि बाबर आझम (नाबाद १००) यांनी साकारलेल्या शतकांमुळे ३ बाद ५५५ धावांवर डाव घोषित केला. पाकिस्तानतर्फे सलामीवीर शान मसूद आणि अबिद अली यांनीही शतके झळकावली होती. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फक्त दुसऱ्यांदाच असा पराक्रम घडला असून यापूर्वी २००७मध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताच्या अव्वल चार फलंदाजांनी शतके झळकावली होती.

४७६ धावांच्या भल्यामोठय़ा लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची दुसऱ्या डावात ७ बाद २१२ धावा अशी अवस्था झाली असून त्यांना विजयासाठी अद्याप २६४ धावांची आवश्यकता आहे. शतकवीर ओशादा फर्नाडोवर (खेळत आहे १०२) श्रीलंकेच्या आशा टिकून आहेत.

संक्षिप्त धावफलक

पाकिस्तान (पहिला डाव) : १९१

श्रीलंका (पहिला डाव) : २७१

पाकिस्तान (दुसरा डाव) : १३१ षटकांत ३ बाद ५५५ डाव घोषित (अबिद अली १७४, शान मसूद १३५, अझर अली ११८, बाबर आझम नाबाद १००; लहिरू कुमारा २/३९)

श्रीलंका (दुसरा डाव) : ६०.१ षटकांत ७ बाद २१२ (ओशादा फर्नाडो खेळत आहे १०२, निरोशान डिक्वेला ६५; नसीम शाह ३/३१)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another record for pakistan batsmen abn
First published on: 23-12-2019 at 00:34 IST