विरूष्काच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत आहे. लग्नाच्या पहिल्या वाढदिवस साजरा करण्यासाठी अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने रोमँटीक प्लॅन केला आहे. विरूष्काने लग्नाचा पहिला वाढदिवस ऑस्ट्रेलियामध्ये साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ११ डिसेंबर २०१७ रोजी विराट आणि अनुष्का लग्नबंधनात अडकले होते. इटलीतील टस्कनी येथे एका आलिशान रिसॉर्टमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता.

एकीकडे भारतीय कर्णधार विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारतीय संघाने नुकतीच टी२० मालिका बरोबरीत सोडली आहे. तर सहा तारखेपासून भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेला सुरूवात होत आहे. दुसरीकडे अनुष्का शर्मा तिचा आगामी चित्रपट झिरोच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हे रोमँटीक कपल आपल्या कामातून वेळ काढून ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहे. अनुष्का शर्मा झिरो चित्रपटाच्या प्रमोशनला दांडी मारून ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये हे रोमँटीक जोडी एकमेंकासोबत क्वालिटी टाइम घालवणार आहे.

DNA च्या रिपोर्टनुसार, अनुष्का शर्माने पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाची तयारी महिनाभरापूर्वीच केली आहे. झिरो चित्रपटाच्या टीमला याबबात अनुष्काने याआधीच कल्पना दिलेली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यावेळी अनुष्का शर्मा ऑस्ट्रेलियामध्ये असणार आहे. लवकरच अनुष्का शर्मा ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.

झिरो चित्रपटाचे पहिल्या टप्यातील प्रमोशन नोव्हेंबर अखेरीस संपणार आहेत. त्यानंतर अनुष्का ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी १० डिंसेबर रोजी संपणार आहे. तर दुसरा कसोटी सामना १४ तारखेला सुरू होणार आहे. या दोन सामन्यातील कालावधील विरूष्का लग्नाचा पहिला वाढदिवस रॉमॅटिक अंदाजात साजरा करणार आहे.