भारताच्या १९ वर्षाखालील संघाकडून पदार्पण केल्यानंतर, भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन मैदानावर उतरण्यास सज्ज झाला आहे. जे. वाय. लेले निमंत्रीतांच्या वन-डे मालिकेसाठी अर्जुनची मुंबईच्या संघात निवड झालेली आहे. काही दिवसांपूर्वीच या संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी सुवेद पारकर या तरुण खेळाडूकडे मुंबईच्या संघाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. १६ सप्टेंबरपासून वडोदऱ्यात या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईचा संघ पुढीलप्रमाणे –

सुवेद पारकर (कर्णधार), दिव्यांश सक्सेना, करण शहा, प्रज्ञेश कानपिळेवार, हर्षित दाफेदार, अर्स्लान शेख, यश साळुंखे, केसरसिंह थापा, वैभव कळमकर, अथर्व अंकोलेकर, भुषण जलावडकर, प्रफुल्ल देवकाते, अर्जुन तेंडुलकर, उझेर खान, बलवंत सिंह सोधा आणि सक्षम पराशर

अवश्य वाचा – विजय हजारे चषकासाठी अजिंक्य रहाणे मुंबईचा कर्णधार

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arjun tendulkar named in mumbai u19 team for invitational odi tournament
First published on: 15-09-2018 at 08:35 IST