सेनादल व केरळ यांनी अनुक्रमे पुरुष व महिला या गटांत सर्वाधिक पदके मिळवित वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय नौकानयन स्पर्धेत वर्चस्व गाजविले.
सेनादलाच्या भोकनलाल दत्तू (सिंगल स्कल), अमृतपालसिंग व रविकुमार (पेअर्स), गणेश पाचौरी व हरशराम (लाइटवेट डबल स्कल), एस.कदम, एस,जगन, सुचासिंग तोमर व नवीनकुमार (कॉक्सलेस फोर) यांनी सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्राच्या दलजितसिंग याने सिंगल स्कलमध्ये रुपेरी कामगिरी केली. शिवसिंग, गुरमितसिंग, तेजस शिंदे व जयदीप शिंगटे यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राने कॉक्सलेस फोरमध्ये कांस्यपदकाची कमाई केली.
महिलांमध्ये केरळच्या तारा कुरियन हिने सिंगल स्कलमध्ये सुवर्णपदक जिंकले. तिच्या सहकारी एम.टी.निम्मी व हनी जोसेफ यांनी पेअर्समध्ये सुवर्णपदक पटकाविले. केरळच्या जिन्सीमोल मॅथ्यु व तारा कुरियन यांनी डबल स्कलमध्ये सोनेरी कामगिरी केली. काक्सलेस फोर शर्यतीत मात्र ओडिशा संघास सुवर्णपदक मिळाले. केरळच्या खालोखाल महिलांमध्ये ओडिशा व चंडीगढच्या खेळाडूंनी पदकांची कमाई केली.
संग्रहित लेख, दिनांक 9th Feb 2014 रोजी प्रकाशित
सेनादल व केरळचे वर्चस्व
सेनादल व केरळ यांनी अनुक्रमे पुरुष व महिला या गटांत सर्वाधिक पदके मिळवित वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय नौकानयन स्पर्धेत वर्चस्व गाजविले.
First published on: 09-02-2014 at 12:01 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Army and kerala dominated