Arshdeep Singh Creates History in T20I Cricket: भारतीय संघाने ओमानवर २१ धावांनी ओमानवर विजय मिळवत विजयाची हॅटट्रिक लावली. वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाला मात्र जागतिक टी-२० क्रमवारीत २०व्या स्थानी असणाऱ्या ओमानने कडवी झुंज दिली. पण अखेरीस भारताने मात्र विजय मिळवला. पण यादरम्यान अर्शधीप सिंगने मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघातील सर्व खेळाडूंना फलंदाजीची संधी मिळावी आणि सराव व्हावा यासाठी फलंदाजी क्रमात मोठा बदल करण्यात आला. सर्वात मोठा बदल म्हणजे भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव ११व्या स्थानी फलंदाजीला येणार होता, पण त्याला संधी मिळाली नाही. यासह भारताने १८८ धावा केल्या.

भारताने ओमानला विजयासाठी १८९ धावांचं लक्ष्य दिलं होतं. प्रत्युत्तरात ओमानच्या सलामीवीरांनी अर्धशतकी भागीदारी करत भारताच्या गोलंदाजांची शाळा घेतली. ओमानच्या आमीर कलीम आणि हमीद मिर्झा यांनी अर्धशतक करत संघासाठी चांगली कामगिरी केली. पण यादरम्यान अखेरच्या षटकात अर्शदीप सिंगने विकेट घेत मोठा विक्रम केला.

अर्शदीप सिंग टी-२० क्रिकेटमध्ये १०० विकेट्स घेणारा भारताचा पहिला गोलंदाज

अर्शदीप सिंगने ही विकेट घेताच टी-२० क्रिकेटमध्ये त्याने १०० विकेट्सचा टप्पा गाठला आहे. अर्शदीप सिंग हा भारतासाठी टी-२० क्रिकेटमध्ये १०० विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमारसारख्या उत्कृष्ट दिग्गज गोलंदाजांना मागे टाकत त्याने मोठी कामगिरी केली आहे.

अर्शदीप सिंग यासह टी-२० क्रिकेट इतिहासात सर्वात कमी सामन्यांमध्ये १०० विकेट्स घेणारा जगातील पहिलाच गोलंदाज ठरला आहे. त्याने ६४ सामन्यांमध्ये १०० विकेट्सचा टप्पा गाठला आहे. त्याच्यानंतर या यादीत रिजवान बट, हारिस रौफसारखे गोलंदाज आहेत.

टी-२० क्रिकेट इतिहासात सर्वात जलद १०० विकेट्स घेणारे वेगवान गोलंदाज

अर्शदीप सिंग – भारत – ६४ सामने
रिजवान बट – बाहरेन – ६६ सामने
हारिस रौफ – पाकिस्तान – ७१ सामने
मार्क अदेर – आयर्लंड – ७२ सामने
बिलाल खान – ओमान – ७२ सामने
शाहीन शाह आफ्रीदी – पाकिस्तान – ७४ सामने
जुनैद सिद्दीकी – युएई – ७४ सामने
लसिथ मिांगा – श्रीलंका – ७६ सामने