Arshdeep Singh 1st County Wicket: भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने १२ जून रोजी सरे विरुद्ध चालू असलेल्या काउंटी चॅम्पियनशिप २०२३ मध्ये केंटसाठी पदार्पण केले. अर्शदीपने सरेचा यष्टिरक्षक-फलंदाज बेन फोक्सला ३ धावांवर LBW बाद करून पहिली विकेट घेतली. त्याने आपल्या अचूक गोलंदाजीने ‘सरे’संघाच्या फलंदाजांना अक्षरशः आपल्या तालावर नाचवले, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.

बेन फोक्सला या डावखुऱ्या वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने ‘ओव्हर द विकेट’ गोलंदाजी करताना जबरदस्त चेंडूवर पायचीत केले. काही कळण्याच्या आत तो बाद झाला आणि तंबूत परतला. त्यानंतर, युवा भारतीय वेगवान गोलंदाजाने डॅनियल मोरियार्टीला १२ धावांवर क्लीन बोल्ड केले. त्याच्या या गोलंदाजीच्या जोरावर केंट कौंटी क्रिकेट क्लब पहिल्या डावात केवळ १४७ धावांवर गारद झाला.

भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने इंग्लंडमध्ये आपल्या चेंडूंवर फलंदाजांना अक्षरशः नाचवले असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. कौंटी क्रिकेटमधली पहिली विकेटही त्याने घेतली. भारतीय गोलंदाज अर्शदीप प्रथमच काऊंटी क्रिकेट खेळत आहे. काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी तो आयपीएलनंतर थेट इंग्लंडला गेला, जिथे त्याने त्याच्या गोलंदाजीने तो शानदार कामगिरी केली आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग नुकताच केंट कौंटी क्लबमध्ये दाखल झाला आहे. अर्शदीपने ११ जूनपासून कौंटी क्रिकेटमध्ये केंट आणि सरे यांच्यातील सामन्यातून पदार्पण केले. भारतीय गोलंदाजाने पदार्पणापूर्वी सांगितले की, राहुल द्रविडच्या सल्ल्यानुसार तो केंट कौंटी क्लबमध्ये सामील झाला आहे. अर्शदीपने सांगितले की, “राहुल द्रविडनेच त्याला केंट क्लबमध्ये जाण्याची प्रेरणा दिली.”

हेही वाचा: Emerging Asia Cup 2023: म्हारी छोरी छोरोसे…, श्रेयंका पाटीलचे पंचक! हाँगकाँगवर भारताचा नऊ विकेट्सने दणदणीत विजय

केंट क्रिकेटने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अर्शदीप सिंगने अनेक गोष्टींबद्दल सांगितले. अर्शदीपने सांगितले की, “त्याला येथे फारसा फरक जाणवत नाही. केंटच का? कारण, मला वाटते की याचे बरेचसे श्रेय राहुल द्रविडला जाते. त्याने मला या काउंटीच्या इतिहासाबद्दल सांगितले आणि इथे खेळण्यासाठी मला प्रेरित केले आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्शदीप सिंग आनंदी आणि उत्साहित दिसत होता

अर्शदीप सिंहने व्हिडिओमध्ये पुढे म्हटले आहे की, “येथे येऊन आणि इतक्या मोठ्या फ्रँचायझीचा एक भाग बनून खरोखरच उत्साही आणि आनंदी वाटत आहे. संघातील लोकांनी मला सांगितल्याप्रमाणे खरोखरच समृद्ध इतिहास असलेला एक महान काउंटी इथे खेळला आहे, पण मी घरापेक्षा थोडीशी थंडी.” येथील हवामानात कसा फरक आहे हे अर्शदीपने सांगितले. तो म्हणाला, “येथे उन्हाळा हिवाळ्यासारखा वाटतो. हवामान खरंच छान आहे, ड्रेसिंग रूममधलं वातावरण खूप चांगलं आहे. प्रत्येकजण माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. मला माहित नाही, कदाचित हा माझा पहिला दिवस असेल आणि म्हणूनच मी संघासह काही आश्चर्यकारक गोष्टी साध्य करण्यासाठी उत्सुक आहे.”