आयपीएल २०२२च्या आधी महेंदसिंग धोनीने अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाच्या हाती कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली होती. पण आयपीएल सुरु असतानाच मध्येच एमएस धोनीला जडेजाकडून पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी स्वतः कडे घ्यावी लागली. यामागचे कारण होते संघाची खराब कामगिरी त्यामुळे संघ व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला होता. भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरच्या मते यावर्षी आयपीएल २०२३ हा एमएस धोनीचा शेवटचा हंगाम असणार आहे त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स संघाचा पुढचा कर्णधार कोण असणार यावर त्याने भाष्य केले आहे.

“रविंद जडेजा भविष्यात सीएसकेचा कर्णधार म्हणून खेळताना दिसू शकतो. पण फ्रँचायझींनी पुढील काही वर्षांसाठी संघाला कोण चांगले नेतृत्व देऊ शकतो यावर निर्णय घेणे अपेक्षित आहे.” असे मत वसीम जाफरने मांडले. तो पुढे बोलताना म्हणाला की, “ जडेजाला सीएसकेने रिटेन केले ही चांगली बाब आहे पण जर चेन्नई सुपर किंग्सला आपले भवितव्य जर आणखी मजबूत करायचे असेल तर मग इतर पर्यायाकडे पाहणे देखील आवश्यक आहे. त्या पर्यायांमध्ये केन विलियम्सन आणि मयांक अग्रवाल या दोन खेळाडूंकडे लिलावात विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.”

“एमएस धोनी नंतर चेन्नई सुपर किंग्सचा पुढचा कर्णधार कोण होणार यावर सध्या बऱ्याच चर्चा होत आहेत. ॠतुराज गायकवाड हा सुद्धा सीएसके साठी कर्णधार म्हणून चांगला पर्याय असू शकतो.” क्रिकइन्फोशी बोलताना जाफरने मत मांडले. तो पुढे बोलताना म्हणाला की, “ डेविन कॉनवेला यष्टीरक्षक आणि ॠतुराज गायकवाडला कर्णधार असे जर सीएसकेने ठरवले तर ही जोडी त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल आणि यामुळे त्यांचे अनेक प्रश्न देखील सुटतील पण धोनीच्या मनात दुसरा आणखी कुठला पर्याय आहे का यावर ही चर्चा होणे आवश्यक आहे.”

हेही वाचा :   सूर्यकुमारचे अग्रस्थान कायम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वसीम जाफर संवाद सांधताना म्हणाला की, “ एमएस धोनी नंतर सीएसकेचे नेतृत्व कोण करणार यावरच सर्वांचे लक्ष असणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्यात ॠतुराज गायकवाड हे नाव सध्या जरी आघाडीवर असले तरी केन विल्यमसन, मयांक अग्रवाल आणि रविंद्र जडेजा हे तीन नावे देखील संघ व्यवस्थापनाच्या डोक्यात असतील. ॠतुराज गायकवाड हा रणजी क्रिकेट मध्ये महाराष्ट्र संघाचे कर्णधार म्हणून देखील खेळत आहे. त्यामुळे त्याच्याकडे कर्णधारपदाचा अनुभव आहे असे आपण म्हणू शकतो. त्यामुळे त्याला कर्णधारपद दिल्यास तो आणखी विकसित होऊ शकतो. आयपीएल २०२२ हा हंगाम त्याच्यासाठी फार काही चांगला गेला नाही पण २०२१च्या हंगामामध्ये त्याने उत्तम कामगिरी केली होती.”