Sunil Gavaskar Slams English Commentators: इंग्लंडने रविवारी अ‍ॅशेस २०२३ मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ विकेट्सने विजय मिळवत पुनरागमन केले. हेडिंग्ले मैदानावर खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात इंग्लंडला विजयासाठी २५१ धावांचे लक्ष्य मिळाले होते, ज्याचा पाठलाग संघाने चौथ्या दिवशी ५० षटकांत ७ विकेट्स गमावून पूर्ण केले. दरम्यान, भारताचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज सुनील गावसकर यांनी इंग्लिश समालोचकांना फटकारले आहे. अ‍ॅशेसदरम्यान भारतीय चाहत्यांवर टीका करणाऱ्या इंग्लिश समालोचकांना गावसकरांनी त्यांना चांगलेच सुनावले आहे.

सुनील गावसकर यांनी इंग्लिश समालोचकांना फटकारले

वास्तविक, इंग्लिश समालोचकांचे म्हणणे आहे की, “भारतीय चाहते त्यांच्या घरच्या संघालाच सपोर्ट करताना दिसतात.” यावर सुनील गावसकर यांनी परदेशी समालोचकांच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हे केवळ भारतातच घडत नाही, प्रत्येक देशात घडते, असे सांगितले. गावसकर यांनी त्यांच्या मिड-डे कॉलममध्ये लिहिले की, “चाहते त्यांच्याच संघाला पाठिंबा देतील आणि विरोधकांना प्रोत्साहन देणार नाहीत हे स्वाभाविक आहे. पण हे फक्त भारतातच घडते असे म्हणणे योग्य नाही. ही काही भारतीय घटना नाही परंतु प्रत्येक देशात असे घडते जेथे देशांतर्गत चाहते गप्प बसतात जेव्हा विरोधी संघाचे खेळाडू चौकार मारतात किंवा आपल्या देशाचे फलंदाज बाद होतात.”

Eid al-Adha (Bakrid
बकरी ईदच्या दिवशी जैन व्यक्तीनं मुस्लीम वेश परिधान करून १२४ बकऱ्या केल्या खरेदी; पण कशासाठी? वाचा नेमकं घडलं काय?
ravindra waikar on evm hacking
“…म्हणून ४८ मतांनी माझा विजय झाला”; रवींद्र वायकरांनी सांगितलं मतांचं गणित; ईव्हीएम हॅक करण्याच्या आरोपावर म्हणाले…
eknath shinde sanjay raut (1)
“शिंदे एलॉन मस्कचा बाप आहे का?” राऊतांचा ‘त्या’ वक्तव्यावर संताप; म्हणाले, “वायकरांना खासदारकीची शपथ देऊ नये”
dayanidhi Maran slams amit shah
“हीच वागणूक तुम्ही निर्मला सीतारमण यांनाही दिली असती का?” ‘त्या’ व्हिडीओवरून माजी केंद्रीय मंत्र्याने अमित शाहांना सुनावलं!
loksatta editorial on ceasefire deal between israel and hamas
अग्रलेख : विध्वंसविरामाच्या वाटेवर…
sudhir mungantiwar on raj thackeray
राज ठाकरेंना नरेंद्र मोदींच्या शपथविधीचं निमंत्रण का नाही? सुधीर मुनगंटीवारांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…
PM Modi Letter After 45 Hours Meditation
४५ तास ध्यान करताना नरेंद्र मोदींनी काय अनुभवलं? पंतप्रधानांनी स्वहस्ते लिहिलेलं पत्र वाचा, म्हणाले, “माझ्या शरीराचा प्रत्येक कण..”
rahul gandhi
VIDEO : शेवटच्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर राहुल गांधींचा कार्यकर्त्यांना संदेश; म्हणाले, “शेवटच्या क्षणापर्यंत…”

हेही वाचा: Asian Games 2023: आशियाई खेळांबाबत BCCIचा मोठा निर्णय, आता आयपीएलच्या धर्तीवर ‘या’ स्पर्धेतही लागू होणार ‘हा’ नियम

माजी भारतीय संघाचे कर्णधार गावसकर पुढे म्हणाले, “सध्याच्या अ‍ॅशेस मालिकेत तुमचे लोक कोणालाच सपोर्ट करत नाही. उलट ते येऊन नुसते शांत बसतात, यापेक्षा अधिक स्पष्ट चित्र कुठेही दिसत नाही. परदेशी समालोचक भारतात आल्यावर सांगत असतात की जेव्हा भारतीय फलंदाज बाद होतो किंवा भारतीय गोलंदाज चौकार मारतो तेव्हा मैदानावर लगेच शांतता पसरते. पण तुमच्याकडे नेहमीच शांत प्रेक्षक असतात, त्यामुळे प्रत्येक देश तेथील माणसे ही वेगळी आहेत.”

हेही वाचा: Virat Kohli: कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी द्रविडसोबतचा फोटो शेअर करत विराट झाला भावूक; म्हणाला, “कधी विचार केला नव्हता…”

सुनील गावसकर यांनी इंग्रजी माध्यमांवरही संताप व्यक्त केला

याशिवाय दुसऱ्या कसोटी सामन्यातील जॉनी बेअरस्टोच्या रनआउटला इंग्लिश मीडिया ज्या प्रकारे कव्हर करत आहे त्यावरही सुनील गावसकर यांनी जोरदार टीका केली. सुनील गावसकर म्हणाले, “सामान्यतः क्रिकेट जगत लॉर्ड्सवरील दुसऱ्या कसोटीत जॉनी बेअरस्टोला स्टंपिंग करण्याच्या योग्य आणि चुकीच्या चर्चेत व्यस्त राहिला, त्यामुळे बेन स्टोक्सची अप्रतिम खेळी मागे पडली. अधिक महत्त्वाच्या घटनांमुळे लहान गोष्टी लगेच झाकोळल्या जातात याचे हे उत्तम उदाहरण आहे. परदेशी मीडिया वर्षानुवर्षे वापरत असलेली ही रणनीती आहे. जिथे संघाचे मोठे अपयश लपवण्यासाठी एखादी छोटीशी घटना घडवून आणली जाते.”