Ravi Shastri on R. Ashwin: या महिन्यात भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. टीम इंडियाच्या खराब कामगिरीचे सर्वात मोठे कारण म्हणजे जगातील नंबर वन कसोटी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनची अनुपस्थिती. त्याला प्लेइंग-११ मध्ये संधी देण्यात आली नाही. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायनने या सामन्यात दुसऱ्या डावात चार विकेट्स घेतल्या. यानंतर अश्विनला सामन्यात संधी न दिल्याबद्दल चौफेर टीका झाली.

भारताच्या पराभवानंतर एका मुलाखतीत अश्विनने बेंचवर बसून भारतीय क्रिकेट संघाबाबत अनेक विधाने केली. तो म्हणाला होता की, “आधी सर्व खेळाडू त्याचे चांगले मित्र होते, पण आता सर्व केवळ सहकारी बनले आहेत.” आता या वक्तव्यावर टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्याने अश्विनला टोला लगावला आहे.

हेही वाचा: MS Dhoni: गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर धोनी पहिल्यांदाच आला समोर; मुलगी झिवा अन् कुत्र्यांसोबतचा मजेशीर Video व्हायरल

अश्विन काय म्हणाला होता?

मागे एका मुलाखतीत, अश्विनला विचारण्यात आले होते की तो मदतीसाठी त्याच्या कोणत्याही संघसहकाऱ्यांशी संपर्क साधेल का, ज्यावर अश्विन म्हणाला, “हा एक गहन विषय आहे”. त्याने सांगितले की संघात प्रत्येक स्थानासाठी तीव्र स्पर्धा आहे आणि या परिस्थितीत आताच्या काळात मैत्री महत्त्वाची नाही.” अश्विन पुढे म्हणाला होता, “हा असा काळ आहे जिथे प्रत्येकजण मित्र नसतो. एकेकाळी जेव्हा क्रिकेट खेळले जायचे तेव्हा तुमचे सर्व सहकारी मित्र होते, आता ते सहकारी आहेत. हा मोठा फरक आहे कारण, इथे लोक स्वतःला वाचवून दुसऱ्याला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. तुमच्या उजवीकडे किंवा डावीकडे दुसरी व्यक्ती बसलेली आहे, पण ‘ठीक आहे, बॉस तुम्ही काय करत आहात’ असे म्हणायला कोणालाच वेळ नाही.”

अश्विन पुढे म्हणाला की, “जेव्हा खेळाडू त्यांचे तंत्र आणि अनुभव शेअर करतात तेव्हा ते संघासाठी चांगले असते, भारतीय संघात त्याच्या जवळचा असा कोणीही नाही आणि असे काही घडतही नाही.” तो म्हणाला “हा एक वेगळा प्रवास आहे. खरं म्हणजे, माझा विश्वास आहे की जेव्हा तुम्ही चांगले-वाईट अनुभव शेअर करता तेव्हा क्रिकेट अधिक प्रगल्भ होते. जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचे तंत्र आणि दुसऱ्या व्यक्तीचा प्रवास समजून घेता तेव्हा ते मने जोडली जातात पण ते किती असावे हे कुठेच नाही. सध्यातरी तुमच्या मदतीला कोणीही येणार नाही.”

हेही वाचा: Cheteshwar Pujara: चेतेश्वर पुजारासाठी टीम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद झाले? BCCIने संघातून का वगळले याबाबत केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 रवी शास्त्रींनी अश्विनला प्रत्युत्तर दिले

आता भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, ज्यांनी अश्विनच्या कार्यकाळात संघासोबत जवळून काम केले होते, त्यांना अश्विनच्या टिप्पणीबद्दल विचारले असता त्यांनी जोरदार टीका केली. शास्त्री यांनी स्पष्टपणे सांगितले की, “ ड्रेसिंग रूममध्ये असो किंवा कॉमेंट्री बॉक्समध्ये सगळीकडे केवळ सहकारीचं असतात.” शास्त्री पुढे म्हणाले, “प्रशिक्षक असताना प्रत्येकजण माझ्यासाठी नेहमीच फक्त सहकारी होता. तुमच्या सहकाऱ्यांमध्ये तुमचे काही मित्र देखील असू शकतात. म्हणजे तुम्ही सांगू शकतात का एखाद्याचे त्याच्या सोबत असणारे किती जवळचे मित्र आहेत? हे जर जाऊन तुम्ही कोणालाही विचारले तर तो म्हणेल त्याच्या आयुष्यात केवळ चार-पाच मित्र आहेत. मी माझ्या आयुष्यात जवळच्या पाच मित्रांसोबत आनंदी आहे, मला आणखी काही नको आहे. मी हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे की नेहमीच तुमच्यासोबत केवळ तुमचे सहकारीच असतील.” असे म्हणत त्यांनी टोमणा मारला.