Sri Lanka-Pakistan will host the Asia Cup 2023: आशिया चषक २०२३ संदर्भात बराच काळ पेच अडकला आहे. ही स्पर्धा कोणत्या देशात होणार हे स्पष्ट झाले नाही. पण आता समोर आलेल्या अहवालात एक मोठा खुलासा झाला आहे. अहवालानुसार आशिया चषक २०२३ पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन देशांच्या यजमानपदावर खेळवला जाणार आहे. त्याच वेळी, स्पर्धेसाठी पाकिस्तानने प्रस्तावित केलेल्या हायब्रीड मॉडेलला देखील मान्यता दिली जाईल आणि आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) कडून १३ जून रोजी अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.

आशिया चषक २०२३ कुठे खेळवला जाणार यावर बराच वेळ चर्चा सुरू होती. त्याचवेळी एसीसी प्रमुख जय शाह लवकरच पाकिस्तानचे हायब्रीड मॉडेल स्वीकारू शकतात. ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, स्पर्धेतील सर्व सामने भारत वगळता पाकिस्तानमध्ये खेळवले जातील. तसेट भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. याशिवाय, पाकिस्तान एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतात येणार असून त्यांना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळण्यास कोणतीही अडचण नसल्याचेही या अहवालात समोर आले आहे.

Pakistan Cricket Board Appoint Gary Kirsten as T20 Format Coach T20 World Cup 2024
T20 WC पूर्वी, पाकिस्तानची मोठी खेळी; भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या दिग्गजाची मुख्य प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती
Pakistan to host Champions Trophy 2025
Champions Trophy 2025 : टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर जाणार की नाही? मोठी अपडेट आली समोर
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
west bengal chief minister bidhan chandra roy include berubari in indian territory from east pakistan
कचाथीवू गमावले, पण बेरूबारी कमावले… नेहरूंचा विरोध डावलून बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी कसा मिळवला पूर्व पाकिस्तानकडून भारतीय भूभाग?

एसीसी सदस्य आणि ओमान क्रिकेटचे प्रमुख पंकज खिमजी यांनी होस्टिंगचा प्रश्न सोडवला आहे. त्यांनी सांगितले की, भारताव्यतिरिक्त उर्वरित सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत, ज्यात पाकिस्तान विरुद्ध नेपाळ, बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका आणि श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामने आहेत, हे सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळवले जातील. त्याचबरोबर भारत विरुद्ध पाकिस्तान आणि भारताचे उर्वरित सामने श्रीलंकेतील गाले किंवा पल्लेकेले येथे खेळवले जातील.

हेही वाचा – IND vs AUS WTC Final: अंपायरने शुबमन गिलची विकेट ढापली! ट्रॉफी जिंकण्यासाठी कांगारूंचा रडीचा डाव, VIDEO व्हायरल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीसीचे सीईओ ज्योफ अल्लार्डिस आणि चेअरमन ग्रेग बार्कले पीसीबी चेअरमन नजम सेठी यांची भेट घेण्यासाठी कराचीला गेले असता, भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी पाकिस्तानने कोणतीही अट ठेवणार नाही, असा निर्णय घेतला. आशिया चषक पाकिस्तानमध्ये आयोजित केला जाईल. कारण, या स्पर्धेच्या यजमानपदाचा अधिकार पीसीबीकडे आहे.

एसीसी बोर्डाच्या एका सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, “ओमान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख पंकज खिमजी, एसीसी कार्यकारी मंडळाचे एक सन्माननीय सदस्य, बहुतेक देशांना हायब्रीड मॉडेल नको असल्याने यावर तोडगा काढण्यासाठी नियुक्त केले होते. पण सध्या लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर पाकिस्तान विरुद्ध नेपाळ, बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका आणि श्रीलंका विरुद्ध बांगलादेश हे चार गैर-भारतीय सामने होणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दोन सामने आणि सुपर फोरचे इतर सर्व सामने पल्लेकेले किंवा गाले येथे खेळवले जातील.”