Suryakumar Yadav Warm Hug With Amir Kaleem: आशिया चषकातील साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाचा सामना ओमानविरूद्ध पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने २१ धावांनी दमदार विजय मिळवला. भारताने ओमानसमोर जिंकण्यासाठी १८९ धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान मुळीच सोपं नव्हतं. कारण भारतीय संघातील अनुभवी गोलंदाजाविरूद्ध खेळताना इतक्या मोठ्या धावांचा पाठलाग करणं ही मुळीच सोपं गोष्ट नाही. पण नवख्या ओमान संघातील फलंदाजांनी पूर्ण जोर लावला आणि आव्हानाच्या जवळ जाण्यासाठी पूर्ण जोर लावला. ओमानचा संघ विजयापासून २१ धावा दूर राहिला. ओमानकडून आमिर कलीम आणि हमद मिर्झा यांनी दमदार फलंदाजी केली.

ओमानकडून धावांचा पाठलाग करताना आमिर कलीम हा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. त्याने ६४ धावांची दमदार खेळी केली. त्याला साथ देत हमद मिर्झाने देखील अर्धशतकी खेळी केल. दोघांनी मिळून ओमानला मजबूत स्थितीत पोहोचवलं. पण शेवटी कलीम बाद झाल्याने सामन्याचं पारडं पुन्हा एकदा भारतीय संघाच्या बाजूने झुकलं. दरम्यान सामना झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने आमिर कलीमला मिठी मारल्याचा फोटो व्हायरल होऊ लागला आहे.

मुळचा पाकिस्तानचा असलेला आमिर कलीम सध्या ओमान संघाकडून खेळत आहे. आमिरचा जन्म कराचीमध्ये झाला आहे. काही दिवसांपूर्वीच सूर्याने पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणं टाळलं होतं. हा वाद तुफान रंगला. पाकिस्तानी चाहत्यांकडून सूर्याला ट्रोल करण्यात आलं होतं. आता आमिर कलीमला मिठी मारल्यानंतर क्रिकेट चाहत्यांकडून त्याचं जोरदार कौतुक आहे. सूर्याने त्याचा खेळ पाहून त्याचं अभिनंदन केलं. पण हे पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना पाहावलं गेलं नाही. त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांकडून सूर्यकुमार यादवला ट्रोल करणारे पोस्ट शेअर केले जात आहे. सामना झाल्यानंतर त्याने ओमानच्या युवा खेळाडूंना मार्गदर्शन केलं. त्यांना आपला अनुभव सांगितला. त्याने ओमान संघातील खेळाडूंसोबत फोटोशूटही केलं.

या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने १८८ धावांचा डोंगर उभारला. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना संजू सॅमसनने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली. तर सलामीला फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अभिषेक शर्मा ३८ धावांची खेळी केली. १८९ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ओमानकडून आमिर कलीमने सर्वाधिक ६४ धावांची खेळी केली. तर हमद मिर्झाने ५१ धावांची खेळी केली. भारतीय संघाने हा सामना २१ धावांनी जिंकून स्पर्धेतील लागोपाठ तिसरा विजय मिळवला.