Afghanistan coach Jonathan Trott on Maxwell: अफगाणिस्तानचे मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी मंगळवारी (७ नोव्हेंबर) मुंबईत झालेल्या आयसीसी विश्वचषक सामन्यात, ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला अफगाण क्षेत्ररक्षकांनी झेल सोडत संधी दिल्याबद्दल निराशा व्यक्त केली आहे. अफगाणिस्तानने पहिल्या खेळात २९१ धावा केल्या. सामन्यात एकवेळ अशी होती की, ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ९१/७ बिकट झाली होती. परंतु, मॅक्सवेलला २२व्या षटकात ३३ धावांवर जीवदान मिळाले आणि त्यानंतर त्याने २०१ धावांची नाबाद खेळी खेळली आणि अफगाणिस्तानच्या हातातोंडाशी आलेला सामना हिरावून घेतला. “मॅक्सवेलसारख्या खेळाडूला चारवेळा जीवदान देणे म्हणजे सामना गमावणे आहे,” असे ट्रॉट म्हणाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अफगाणिस्तानच्या पराभवानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ट्रॉट म्हणाला, “आम्ही ज्या परिस्थितीत होतो त्याचा फायदा उठवायला हवा होता. संघाने चार झेल सोडले होते आणि मॅक्सवेलसारख्या खेळाडूला संधी देणे म्हणजे सामना गमावणे. त्याचा फायदा घेत त्याने मोकळा श्वास घेत मोठे फटके खेळण्यास सुरुवात केली. अफगाणी गोलंदाजांनी त्याला स्वातंत्र्य दिले आणि त्याने मुक्तपणे चौकार-षटकार मारले. त्यानंतर हा सामना ऑस्ट्रेलियाकडे वळवला. ही एक अविश्वसनीय अशा स्वरुपाची जागतिक दर्जाची खेळी होती. पण अर्थातच आम्हीही त्याला यात मदत केली.”

हेही वाचा: NZ vs SL: न्यूझीलंड-श्रीलंका सामन्यात पाऊस पडल्यास पाकिस्तानला होणार फायदा? जाणून घ्या बंगळुरूचे हवामान

अफगाणिस्तानचे खेळाडू मॅक्सवेलला बाद करण्याची वाट पाहत राहिले: ट्रॉट

मॅक्सवेलची खेळी जसजशी पुढे सरकत गेली तसतसे त्याचे आणि कमिन्सचे मनोबल वाढले आणि अफगाणी खेळाडूंचे कमी झाले,” असे ट्रॉटने सांगितले. तो पुढे म्हणाला की, “मॅक्सवेलने एका अननुभवी संघाला जागतिक दर्जाचा संघ आणि जागतिक दर्जाच्या खेळाडूंविरुद्ध कधीही हार न मानण्याचा धडा आहे.” ट्रॉट पुढे म्हणाला, “तुम्ही कोणत्याही जागतिक दर्जाच्या खेळाडूचे चार झेल सोडता तेव्हा तो तुमचे नुकसान करणाच. तुमचे क्षेत्ररक्षण सतत सुधारत राहणे ही काळाची गरज आहे. हे न झाल्यामुळे आज आम्हाला महत्त्वाचा सामना गमवावा लागला. त्यामुळे ही एक छोटी गोष्ट आहे ज्यातून प्रत्येकजण शिकू शकतो.”

प्रशिक्षक जोनाथन पुढे म्हणाला, “दुर्दैवाने जेव्हा दुसरा झेल सोडला तेव्हा सर्वजण मॅक्सवेलच्या आऊट होण्याची वाट पाहत होते. मला फारसा उत्साह किंवा खेळाडू एकमेकांना प्रोत्साहन देताना दिसले नाहीत. त्यावेळी मानसिकता थोडीशी अशी झाली होती की, ‘ठीक आहे, आपण अजूनही जिंकू अशी आशा करूया.’ ऑस्ट्रेलियासारख्या संघाविरुद्ध मिळालेली संधी सोडायची नसते. ते तुम्हाला पुन्हा अशी कधीच देणार नाहीत. त्यामुळे ती संधी तुम्ही दोन्ही हातांनी मिळवायची होती. अशा प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या आपण आजपासून शिकू शकतो. त्याबद्दलच आपण ड्रेसिंग रूममध्ये खूप बोललो आहोत.”

हेही वाचा: IND vs NED: नेदरलँड्स सामन्याआधी विराट कोहलीची सराव सत्राला दांडी, काय आहे त्यामागील कारण? जाणून घ्या

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवामुळे अफगाणिस्तानचा उपांत्य फेरीचा मार्ग कठीण?

ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन विकेट्सनी पराभव झाल्यामुळे अफगाणिस्तानने पहिल्यांदाच विश्वचषक उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याची संधी गमावली. आता ते आठ गुणांसह पाकिस्तान आणि न्यूझीलंडशी बरोबरीत आहेत परंतु नेट रनरेटमध्ये ते दोघांच्याही मागे आहेत. त्यांचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेच्या बलाढ्य संघाशी होणार आहे. विजयी स्थितीत येऊनही ऑस्ट्रेलियाविरुद्ध गमावलेले दोन गुण आपल्या युवा संघाला भविष्यासाठी धडा शिकवतील अशी ट्रॉटला आशा आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aus vs afg coach jonathan trotts pointed statement on afghanistan defeat said we helped him in this avw
First published on: 08-11-2023 at 22:39 IST